पोखरी (घाट) शेतकरीपुत्रांचे भाववाढीच्या ‘शेतकरी हक्क मोर्चा’त सहभागी होण्याचे आवाहन
लिंबागणेश : (दि. २२)बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील पोखरी (घाट) येथील शेतकरी पुत्रांनी कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतमालाला वाढीव दर मिळावा, सीसीआय व जिनिंग केंद्रांवरील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी तसेच हमीभावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांसाठी होणाऱ्या ‘शेतकरी हक्क मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दि. २५ डिसेंबर (गुरुवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे काढण्यात येणाऱ्या धडक ‘शेतकरी हक्क मोर्चा’चे आयोजन शेतकरी पुत्रांनी केले असून, या मोर्चामार्फत राज्य सरकारने कापसाला १२ हजार, सोयाबीनला ७ हजार व तुरीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करावा, अशी ठाम मागणी करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर आज दि. २२ (सोमवार) रोजी पोखरी (घाट) येथील मुख्य चौकात शेतकरी पुत्र डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या पुढाकाराने शेतकरी जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सरपंच बिभीषण मुळीक, आण्णासाहेब खिल्लारे, नितीन दळवे, सर्जेराव बाबर, सुंदर खिल्लारे, सुनील सांगळे, दत्ता भिसे, दामोदर हिंदोळे, चांगदेव मुळीक, हनुमंत कणसे, अशोक खिल्लारे, सोमिनाथ फाळके, अंकुश मुळीक, बाबासाहेब माने, रावण खिल्लारे, त्रिंबक खिल्लारे, सुखदेव मुळीक, किरण माने आदी शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment