शेजारील जिल्ह्यातील तालुके झपाट्याने बदलत असताना पाटोदा शहर मात्र अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडते - गणेश शेवाळे


पाटोदा (प्रतिनिधी)पाटोदा शहराचा विकास रखडलेला; मूलभूत सुविधांअभावी नागरिकांमध्ये असंतोष पाटोदा तालुका व शहराचा विकास आजही अपेक्षेप्रमाणे झालेला दिसत नाही. शेजारील जिल्ह्यातील तालुके झपाट्याने बदलत असताना पाटोदा शहर मात्र अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.पाटोदा शहरातील चौक-चौकात महामानवांचे पुतळे, चौकांचे सुशोभीकरण अद्याप झालेले नाही. इतर शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली चौक सुशोभीकरण, सांस्कृतिक ओळख जपली जात असताना पाटोदा शहर या बाबतीत मागे असल्याचे स्पष्ट होते.पाटोदा बाजारपेठेजवळील मांजरा नदीकाठी सुसज्ज व सुरक्षित नदीघाटाची सुविधा आजही उपलब्ध नाही. त्यामुळे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे.शहरातील बहुतांश रस्त्यांची अवस्था खराब असून खड्डे व धुळीमुळे वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ शौचालयांचा अभाव असूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.पाटोदा शहरातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक व युवकांसाठी चालण्याचे ट्रॅक, खुली जिम यांसारख्या आरोग्यविषयक सुविधांचाही अभाव आहे.
शहरात नळजोडण्या व पाणीपुरवठा योजना असतानाही नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी नियमितपणे मिळत नसल्याचे वास्तव आहे.
कोणालाही विरोध नसून केवळ आपल्या शहराचा विकास व्हावा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र पाटोदा शहराचा विकास नेमका का थांबला आहे, असा सवाल सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. पाटोदा तालुका व शहराच्या विकास प्रश्नांवर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने ठोस आणि जबाबदार भूमिका घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश शेवाळे यांनी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी