उमेद अभियानाच्या आंदोलनाच्या मागण्यांसाठी ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांचे सोबत आमदार श्री.अमोल दादा जावळे यांनी केली सकारात्मक चर्चा
उमेद अभियानाच्या आंदोलनाच्या मागण्यांसाठी ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांचे सोबत आमदार श्री.अमोल दादा जावळे यांनी केली सकारात्मक चर्चा
माननीय आमदार श्री अमोल दादा जावळे यांनी आंदोलन स्थळी भेट देवून रावेर यावल मतदारसंघातील महिलांसोबत केली प्रत्यक्ष चर्चा.
बीड प्रतिनिधी ) दि. 11 डिसें. 2025
नागपूर अधिवेशन मध्ये उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत महिला व कल्याणकारी संघटनेच्या वतीने संघटनेच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.
उमेद अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम शासन सेवेत सामावून घेणे.
सीआरपी सर्व केडर यांना ग्रामसखी पदावर मान्यता मिळून मानधन वाढ झाली पाहिजे.iJP, जिल्हा बाह्य बदली,
बचत गटांना भरभरून निधी शासनाने दिला पाहिजे.
अशा विविध मागण्यांसह सर्व महिलांनी दादांकडे आग्रहाची मागणी केली
माननीय आमदार श्री अमोल दादा जावळे यांची उमेद मॉल ची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे. तसेच उमेद च्या मागण्यांचे विविध प्रश्न दादांनी विधानसभेत आणि विधान भवनामध्ये वारंवार मांडलेले आहेत, तसेच नागपूर येथे जेवण व्यवस्था केल्यामुळे सर्व महिलांनी श्री. अमोल दादां जावळे यांचे जाहीर आभार मानलेले आहेत.
ग्रामविकास मंत्री माननीय श्री जयकुमार गोरे यांनी संघटनेच्या मागण्या मान्य करावे यासाठी विधान भवनामध्ये अमोल दादा यांनी सकारात्मक चर्चा केली.
त्यामुळे उमेद अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..
Comments
Post a Comment