गहाळ मोबाईल शोधणारे बीड पोलिस; मात्र ५ वर्षांपासून जप्त मोबाईल परत देण्यास असमर्थ!— डॉ. गणेश ढवळे यांचा पोलिस प्रशासनाला जाहीर सवाल

गहाळ मोबाईल शोधणारे बीड पोलिस; मात्र ५ वर्षांपासून जप्त मोबाईल परत देण्यास असमर्थ!
— डॉ. गणेश ढवळे यांचा पोलिस प्रशासनाला जाहीर सवाल
बीड :- (दि.१७)“पोलिसांची सतर्कता, नागरीकांचा विश्वास” असा ब्रीदवाक्य वापरत गहाळ मोबाईल शोधून पोलिस अधीक्षक नवनित कांवत यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल परत देतानाचे फोटो ‘बीड पोलिस’च्या अधिकृत फेसबुक पेजवर व विविध दैनिकांत झळकत असताना, याच बीड पोलिस प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांचा तपासासाठी जप्त केलेला मोबाईल तब्बल पाच वर्षे उलटूनही परत दिलेला नाही, असा गंभीर आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.

कोरोना कालावधीत बीड जिल्हा रुग्णालयातील अनियमितता व कथित गैरव्यवहार उघडकीस आणल्याने सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करत औरंगाबाद खंडपीठाने हा गुन्हा दि. २७ जुलै २०२३ रोजी रद्द केला. मात्र, त्या गुन्ह्याच्या तपासासाठी दि. ०९.०९.२०२० रोजी बीड शहर पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी जप्त केलेला मोबाईल आजतागायत परत करण्यात आलेला नाही.

डॉ. ढवळे यांच्यावर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ०२१०/२०२०, भा.दं.वि. कलम ५०५(२), १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला अ‍ॅड. महेश भोसले यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

गुन्हा रद्द होऊनही वारंवार प्रत्यक्ष भेटी, लेखी निवेदने देऊनसुद्धा मोबाईल परत न मिळाल्याने डॉ. ढवळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“जर पोलिस प्रशासन गहाळ झालेले मोबाईल शोधून नागरिकांना सन्मानपूर्वक परत देत असेल, तर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीररीत्या जप्त केलेला मोबाईल परत देण्यास अडचण काय?” असा थेट सवाल त्यांनी पोलिस अधीक्षक नवनित कांवत यांना केला आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी