विकासाभिमुख प्रशासनाला जनतेची पावती! जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे २९ जागांसह निर्विवाद वर्चस्व
विकासाभिमुख प्रशासनाला जनतेची पावती! जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे २९ जागांसह निर्विवाद वर्चस्व
'हा जनादेश डबल इंजिन सरकारवरील विश्वासाचा'; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले मतदारांचे आभार
पणजी, २२ डिसेंबर २०२५: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपने २९ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांचा मित्रपक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (एमजीपी) आणखी ३ जागांची भर घातली, ज्यामुळे एनडीए आघाडीला एकूण ३२ जागा मिळाल्या आहेत.
भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि आम्हाला प्रचंड विजयाचा आशीर्वाद दिल्याबद्दल मी गोवावासियांचे मनःपूर्वक आभार मानतो अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
७०.८१ टक्क्यांचे विक्रमी मतदान:-
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या रिंगणात भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, आरजी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पक्षांचे आणि अपक्ष मिळून २६६ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीसाठी शनिवारी ७०.८१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने वाढीव मतदान कोणत्या पक्षाला मिळणार, याकडे जनतेचे लक्ष लागून होते. अखेर, सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार गोमंतकीय जनतेने जिल्हा पंचायत निवडणुकीतही भाजपलाच पसंती दिल्याचे दिसून आले.
'डबल इंजिन सरकार'वर लोकांचा विश्वास;-
या विजयाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, 'हा प्रबळ जनादेश माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या गतिमान नेतृत्वाखालील, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे.पी. नड्डा जी आणि भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री नितीन नवीन जी यांच्या मार्गदर्शनाखालील 'डबल इंजिन सरकार'वरील लोकांचा विश्वास दर्शवतो, तसेच तळागाळातील सक्षमीकरण आणि लोककेंद्रित प्रशासनाप्रती असलेल्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचेही प्रतीक आहे.
आता विकसित गोवा व विकसित भारताच्या दिशेने जोमाने काम सुरु:-
भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष श्री दामू नाईक यांच्या नेतृत्वाखालील आमच्या समर्पित कार्यकर्त्यांचेही मी कौतुक करतो, ज्यांनी आमचा दृष्टिकोन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. मला विश्वास आहे की, भाजपच्या नेतृत्वाखालील युती सर्वांगीण विकासाला गती देईल, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन अधिक मजबूत करेल आणि विकसित गोवा व विकसित भारताच्या दिशेने काम करेल, असेही मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत म्हणाले.
जनतेचा विकासाला कौल:-
ही निवडणूक केवळ राजकीय विजय नसून, मागील काही वर्षांत राज्य सरकारने राबवलेल्या विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाला मिळालेली पावती आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, कृषी तसेच महिला आणि युवक सक्षमीकरणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विजयी उमेदवारांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडून कौतुक:-
दरम्यान होंडा, केरी, नगरगाव, उसगाव, कारापूर, सर्वण, मये, लाटंबार्से, डिचोली, सावर्डे, सांकवाळ, शिवोली, ताळगाव, बार्शे, पेन्ह द फ्रान्स, सुकूर, सावर्डे, धारबांदोडा, चिंबल, प्रियोळ, कळंगुट, बोरी, कुडचडे, कुर्टी खांडेपार, आमोणा, मोरी, साळगाव या भागातील विजयी उमेदवारांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांची पणजी आल्तिन्हो येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी निवडणुकीत मिळालेल्या उज्ज्वल यशाबद्दल विजयी उमेदवारांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment