पोथरा येथील काशेश्वरी भजनी मंडळाचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य


(चौसाळा प्रतिनिधी) बीड तालुक्यातील असलेल्या पोथरा येथील काशेश्वरी भजनी मंडळ हे गावातील महिला व पुरुष यांनी एकत्र येऊन भजनी मंडळाची स्थापना केली असून याची अधिकृत नोंदणी देखील केलेली असून याचा र. जि. क्र.16 875 हा आहे. या भजनी मंडळातील पेटी मास्तर व भजनी मंडळाचे अध्यक्ष अश्रुबा हावळे,मृदंगाचार्य मधुकर लंबाटे, गायनाचार्य विष्णू खनाळ,केशरबाई खनाळ,केशर बाई हावळे, चंद्रकला कांबळे, साखरबाई काळे, कालींदाबाई तातूडे इत्यादी सदस्य हे चांगल्या प्रकारे गायन करतात व ते आपल्या कलेतून संगीत भजन हरिपाठ हरी किर्तन समाजात समाज प्रबोधन व्यसनमुक्ती स्त्रीभ्रूणहत्या सामाजिक बांधिलकी अंधश्रद्धा निर्मूलन या माध्यमातून गेली 35 वर्ष समाजसेवा करत आहे त्यांना परिसरातील अनेक गावातून हरिनाम सप्ताह जागर विविध ग्रंथ समाप्तीसाठी या भजनी मंडळास आमंत्रित केले जाते हे सर्व कलावंत उत्तम प्रकारे अभंग गवळणी भारुड या प्रकारे गायनाद्वारे सादर करून कार्यक्रम पार पाडतात पेटी मास्तर श्री अश्रुबा हावळे यांच्या मार्गदर्शनाने हे भजनी मंडळ कला सादर करत आहे त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन योजनेचा लाभ मिळावा असे काशेश्वरी भजनी मंडळ पोथरा या भजनी मंडळातील सदस्य यांनी मागणी केली आहे

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी