आयुर्मंगलम् निवासी मूकबधिर विद्यालयात 81 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,
आयुर्मंगलम् निवासी मूकबधिर विद्यालयात 81 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,
43 व्या " वाचाल तर वाचाल "वाचनालयाचा प्रारंभ.....
( महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचालचा उपक्रम )
बीड प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनी मिळालेल्या वही पेन दानातून महामानव अभिवादन ग्रुपने आयुर्मगलम् निवासी मूकबधिर विद्यालय बीड येथे 81 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ( वही पेन) वाटप केले. तर मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी म्हणून वाचन संस्कृती वाढवण्याकरिता प्रयत्न करत असलेल्या वाचाल तर वाचाल ह्या फिरते मोफत वाचनालयाच्या 43 व्या केंद्राचा 100 पुस्तकांचा संच देऊन प्रारंभ करण्यात आला. वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालयाला सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार " गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस प्राप्त सुहास पालीमकर यांनी सुहास्य नगरीचे रेषा संदेश या पुस्तकांच्या 6 प्रती भेट दिल्या त्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक अलोक कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचाल तर वाचाल वाचनालयाचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे, व समता सैनिक दलाचे मेजर तथा कॅप्टन राजाभाऊ आठवले लाभले होते. महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, डी.एम. राऊत, व के.एस.वाघमारे यांची विचार मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.एस.भुजबळ यांनी केले. तर प्रास्ताविक जी.एम.भोले यांनी केले.
सर्वप्रथम स्वामी विवेकानंद, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलीत करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी भारतीय घटनेच्या प्रस्ताविकाचे वाचन घेतले.
आपल्या प्रास्ताविकात जी.एम.भोले यांनी महामानव अभिवादन ग्रुप करत असलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देऊन सांगितले की दररोज सकाळी 9 वाजता बीड शहरातील दर्शनी भागात असलेल्या 9 पुतळ्यांना पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात येते. ते कार्य म्हणजे त्यांचे दैवतिकरण नसून त्यांच्या महान कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,लहानपणी शिक्षण घेताना आपल्याला आलेल्या अनेक अडचणीस कसे तोंड द्यावे लागले,हे जाणून इंग्रजी माध्यमांच्या शाळेमुळे शिक्षण खूप महाग झाले आहे. गोरगरिबांचे,मजूर वस्तीतील मुले शिक्षणात मागे पडू नये म्हणून बीड शहरात 4 ठिकाणी दानदात्यांच्या मदतीमुळे मोफत शिकवणी वर्ग चालवण्यात येत आहेत. त्या मुलांची शिक्षणात चांगली प्रगती होत आहे. ही आनंदाची बाब आहे असे स्पष्ट केले.
निवासी शाळेतील वर्ग दहावीचा विद्यार्थी गणेश कांबळे यांनी अभिवादन केलेल्या सर्व महापुरुषांच्या कार्याबद्दल त्याला येत असलेल्या हाताच्या व चेहऱ्याच्या हव भावा द्वारे माहिती दिली. महापुरुषांचे कार्य व उपदेशा पासून प्रेरणा घेऊन शिक्षणात कितीही अडचणी आल्या तरी उच्च शिक्षण घेऊन प्रगतीचे शिखर गाठू असा दृढ विश्वास व्यक्त केला. या विद्यार्थ्याचे मनोगत वाचा उपचार तज्ञ नामसेकर जे.एस.यांनी उपस्थितीना अवगत करून दिले. त्या मनोगतातील दृढनिश्चया बद्दल सर्वांनी टाळ्यांच्या गजरात गणेश कांबळे यांचे कौतुक करून वाचाल तर वाचाल वाचनालया तर्फे शालेय साहित्य व " यु कॅन डू" हे प्रेरणादायी पुस्तक मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोपात आलोक कुलकर्णी म्हणाले की सामाजिक भान ठेवून आयुर्मगलम निवासी मूकबधिर विद्यालयतील विद्यार्थ्यांच्या मनात दिव्यांगपणाचा न्यूनगंड निर्माण न होऊ देता तेही उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊ शकतात यासाठी सतत कसे प्रयत्नशील आहे हे उपस्थितना सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी.एम.राऊत यांनी केले.कार्यक्रमास निवासी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment