संभाजीनगर येथील एम. एस. सी. बी.च्या कार्यातील कॉन्ट्रेक्ट बेस वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचारयावरती कारवाई साठी आदोलन
संभाजीनगर येथील एम. एस. सी. बी.च्या कार्यातील कॉन्ट्रेक्ट बेस वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचारयावरती कारवाई साठी आदोलन
कार्यकारी अभियंता भोसरी येथील कार्यालयासमोर भिमशाही युवा संघटनेचे आंदोलन
(पुणे प्रतिनिधी)
संभाजीनगर एम. एस. सी. बी. च्या कार्यालयातील  कॉन्ट्रॅक्ट बेस वरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
सदर आंदोलनामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांनी आठ दिवसांमध्ये संबंधित गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यावरती कारवाई न केल्यास पुणे येथील रास्ता पेठ कार्यालयासमोर शहरातील समविचारी संघटनांना सोबत घेऊन मोठ्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
  संभाजीनगर येथील एम. एस. ई. बी. च्या कार्यालयातील कॉन्ट्रॅक्ट बेस वरील कर्मचारी वीज ग्राहकांशी उद्धट. व आरे रावीची. गुंडगिरीची. भाषा करत असल्याने त्याच्या वरती निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातुन करण्यात आली.सदर गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांवरती व त्याच्या ठेकेदारावर आठ दिवसाच्या आत कारवाई करावी असे मत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शांताराम खुडे यांनी व्यक्त केले. भिमशाही युवा संघटनेच्या वतीने  मुख्य अभियंता रास्ता पेठ. पुणे. कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले .
  आजच्या आंदोलनातन  संबंधित ठेकेदार व गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करावी ही प्रमुख मागणी  भीमशाही युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली.
 सदर आंदोलनाचे नेतृत्व भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे व सामाजिक कार्यकर्ते कमलेश वाळके यांनी केले.आंदोलनामध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन नायर. भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शांताराम खुडे. सचिन कसबे . सद्दाम शेख. ऋषिकेश गायकवाड. अमोल घाडगे. आकाश सोनवणे. बाळासाहेब जाधव.आदी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment