अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य युवक प्रदेशाध्यक्ष पदी रोहन गलांडे पाटील यांची नियुक्ती


बीड/प्रतिनिधी 
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील रोहन गलांडे पाटील यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्रराज्य युवक प्रदेशाध्यक्ष पदी, सचिव चंद्रकांत दादा जाधव व कार्याध्यक्ष सतिष पवार पाटील  यांच्या शिफारशीनुसार अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले पाटील यांच्या आदेशानुसार नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे तरी रोहन गलांडे पाटील यांनी कुणबी मराठा महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले यांचे व सर्व वरीष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत,आयुष्यभर ऋणी राहीन असे मत व्यक्त केले आहे.तसेच रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले की संघाने माझी नियुक्ती आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन केलेली आहे जसे की मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक छोटे मोठे आंदोलने विकास कामे केले आहेत त्यांची दखल घेऊन मला अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे मी यापुढेही असेच सर्वसामान्य जनतेसाठी सर्व जातिधर्मातील नागरिकांनसाठी कायम लढत राहील शेवटच्या श्वासापर्यंत व महाराष्ट्रात अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे संघटीकरण मोठ्या संख्येने करणार आहे असे वचन संस्थापक अध्यक्ष यांना दिले आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी