घा ,पारगाव गटातुन युवा नेते सुशील कोळेकर यांना ओबीसी बहुजन मोर्चाचे मा हाके साहेब यांचा निवडणूक लढवण्या संदर्भात आदेश.
बीड प्रतिनिधी
आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिरूर तालुक्यातील  घा पारगाव,गण किंवा गटातुन पंचक्रोशीतील युवक नेते सुशील बापु कोळेकर यांनी निवडणूक लढवुन समाजीक कार्य करण्यासाठी संधी.ओबीसी बहुजन मोर्चाचे प्रमुख मा लक्ष्मणजी हाके साहेब यांनी आदेश देऊन तयारी सुरू करा जनसंपर्क वाढवा असा मोलाचा आदेश आला आहे.
गेली 20 वर्षात रासप जानकर यांच्या पक्षांच्या माध्यमातून सुशिल बापु कोळेकर यांचे सतत शिरूर कासार तालुक्या सहीत बिड जिल्हा भर कार्य आहे.
रासप माध्यमातुन त्यांनी सतत अनेक जातीधर्माच्या बहुजन समाजाला आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जसं जमेल तसं सहकार्य केले आहे.
आणि आता मध्यंतरी गेल्या 5 वर्षात व्युट्युब रिल स्टार हिरो म्हणून त्यांची अनेक गाणी व छोटं छोट्या रिलच्या माध्यमातून ते चांगले प्रसिद्धी झोतात आले आहेत.
युवक वर्गात त्यांची एक मोठी क्रेझ निर्माण झालेली असल्याने.शिरूर तालुक्यातील धनगर समाजाला 30 वर्षात कोणत्याही पक्षाने आज पर्यंत कधीच संधी धनगर लोकांना न दिल्याने या वेळी मा हाके साहेब यांच्या माध्यमातून ती संधी उपलब्ध होणार असल्याने.
घा,पारगाव पंचक्रोशीतील जनतेमध्ये सुशिल बापु यांच्या विषयी मोठी आत्मियता व भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
असा तरुण युवक हाच जनहितार्थ सतत कार्यरत असतो .
इत्यादी सर्व बाबींची नोंद घेऊनच सुशिल बापु कोळेकर यांना हाके साहेबांनी आदेश दिल्याने.
सुशिल बापु कोळेकर हे आता संपुर्ण ताकतीने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत व निवडुणच येण्या संदर्भात त्यांच्या प्रचाराची धुरा सर्व युवकांच्या स्वाधीन आसेल .
आसे युवक नेते सुशील बापु कोळेकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
Comments
Post a Comment