पालवण ते लिंबागणेश १३ कोटींच्या रस्त्याची दुर्दशा; बेशरम कंत्राटदार आणि प्रशासनाचा खड्ड्यात बेशरमांची झाडे लाऊन निषेध ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ‘राजकीय पोसणी’साठीच?
पालवण ते लिंबागणेश १३ कोटींच्या रस्त्याची दुर्दशा; बेशरम कंत्राटदार आणि प्रशासनाचा खड्ड्यात बेशरमांची झाडे लाऊन निषेध ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ‘राजकीय पोसणी’साठीच? :- डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (दि. ०४):मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील पालवण चौक ते लिंबागणेश या २४ कि.मी. लांबीच्या रस्त्यावर तब्बल १२ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असलेल्या मदन मस्के कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरुवातीपासूनच अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे डांबर, वाळू-खडीचे चुकीचे प्रमाण वापरल्याने रस्ता काही महिन्यांतच उखडला आहे.
या कंपनीच्या हायवा ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक होत असल्याने रस्ता खचला असून, जागोजागी खोल खड्डे आणि भगदाड पडले आहेत. पावसाळ्यात हा रस्ता दलदलीत परिवर्तित झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवासी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या दुर्दशेबद्दल संतप्त ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला — खड्ड्यांमध्ये बेशरम झाडे लावून “बेशरम कंत्राटदार आणि प्रशासनाचा” विरोध व्यक्त करण्यात आला.
या निषेधावेळी सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ,शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, शंकर वाणी, बेलगाव सरपंच जाधव,दादासाहेब गायकवाड, सुदाम गिरे,रामदास मुळे, नवनाथ मुळे, गणेश तागड, महावीर मुळे,विनायक खिल्लारे, श्रीमंत वायभट, अशोक खिल्लारे, आप्पासाहेब वायभट ,जिवन कापसे,शिवाजी वायभट, राजेंद्र गिते,सुदाम रणखांब, उद्धव रणखांब,रामराज मुळे, अर्जुन भिसे, विक्रम भोसले , विनायक खिल्लारे,आश्रुबा तागड, ईश्वर शिंदे, गोरख मुळे, सर्जेराव मुळे ,दादा मुळीक, प्रविण मुळे 
 यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
“ग्रामसडक योजना म्हणजे जनतेसाठी नव्हे तर राजकीय पोसणीसाठी” — डॉ. गणेश ढवळे
डॉ. ढवळे म्हणाले की, “तत्कालीन ग्रामविकास मंत्री व विद्यमान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सन २०१५ ते २०२१-२२ दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तब्बल १९३३ कि.मी. लांबीचे व १९८६ कोटी रुपयांचे रस्ते ग्रामीण भागासाठी मंजूर केले होते. पण हे रस्ते ग्रामस्थांच्या सोयीसाठी नव्हे, तर राजकीय नेते, कंत्राटदार आणि काही अधिकाऱ्यांना पोसण्यासाठीच होते, हे आता प्रत्यक्ष अनुभवाने स्पष्ट झाले आहे.”
राजकीय पाठिंब्यामुळे रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची :- शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील 
बालाघाटावर लिंबागणेश आणि चौसाळा सर्कल मधील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आलेली कामे राजकीय लोकांच्या नातेवाईकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आर्थिक साटेलोटे करत करण्यात आली असल्याने अत्यंत निकृष्ट दर्जाची असुन तक्रारीनंतर सुद्धा कारवाई करण्यात येत नाही संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी  भविष्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा बाळासाहेब मोरे पाटील यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment