बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना डावलले,ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून तीव्र निषेध- सोनवणे
बीड, दि. १७ नोव्हेंबर : बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी चळवळीतील समर्पित व कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलून व (sc) चे राखीव आरक्षण गिळण्यास जातदांडगे व प्रस्थापित राजकारण्यांकडून राजकीय अस्पृश्यता पाळली जात असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅंथर सेनेने केला आहे.ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “शेकडो वर्ष सामाजिक अस्पृश्यतेचे चटके सहन करणाऱ्या वर्गाला आजही जात दांडग्या व प्रस्थापित राजकारण्याकडून बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना राजकीय वेशीबाहेर ठेवून खऱ्या अर्थाने राजकीय अस्पृश्यता पाळली जात आहे. या गोष्टीचा आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो.”या निवेदनामुळे जिल्ह्यातील निवडणूक वातावरण ढवळून निघाले असून आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. पॅंथर सेना येत्या काही दिवसांत स्वतंत्रपणे किंवा इतर आंबेडकरी संघटनांसोबत संयुक्त आघाडी उभी करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. का?याकडे बीडकरांच्या लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment