बीड मध्ये डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी एस.डी.पी.आय. तर्फे निवेदन — निष्पक्ष चौकशी व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

 बीड मध्ये डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी एस.डी.पी.आय. तर्फे निवेदन — निष्पक्ष चौकशी व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी!
बीड (प्रतिनिधी):
डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद आत्महत्येच्या (हत्या) प्रकरणी संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबास न्याय मिळावा आणि जबाबदार व्यक्तींनी आपल्या नैतिक जबाबदारीचा स्वीकार करून तत्काळ राजीनामे द्यावेत, अशी मागणी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ( एस डी पी आय ) बीड जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

या प्रसंगी एस डी पी आय बीड जिल्हाध्यक्ष सय्यद आबेद अब्बास यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी काॅ.नितिन जायभाये (अध्यक्ष शहर बचाव मंच), माऊली शिरसाट( ओबीसी नेते व सामाजिक कार्यकर्ते), डॉ. संजय तांदळे (मातृभूमी प्रतिष्ठान), डॉ. साक्षी ताई जोगदंड,लेक लाडकी अभियान चे बाजीराव ढाकणे, खंडुभाऊ जाधव (वंचित बहुजन आघाडी), रोशन केकान (सामाजिक कार्यकर्ते) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

निवेदनात असे नमूद करण्यात आले की,
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली नसून, त्यांना दीर्घकाळ चाललेल्या मानसिक छळामुळे आणि काही उच्च पदस्थांच्या दबावामुळे आत्महत्या करावी लागली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हेगारांवर तात्काळ कलम लावून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांनी या घटनेबाबत पीडितेच्या चारित्र्यहननासारखी विधाने केली असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

निवेदन स्वीकारताना प्रशासनाने गंभीरतेने बाब हाताळण्याचे आश्वासन दिले. तथापि, एस डी पी आय बीड जिल्हा शाखेने इशारा दिला की, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर बीडमध्ये मोठं आंदोलन उभारण्यात येईल.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी