कपिलधार यात्रेसाठी भाविकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्या आम आदमी पार्टीची मागणी
कपिलधार यात्रेसाठी भाविकांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून आम आदमी पार्टीची मागणी
माजी सैनिक आशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी 
बीड जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी देवस्थान, श्री क्षेत्र कपिलधारवाडी येथे दरवर्षी भव्य यात्रा भरते. या यात्रेला देश-विदेश तसेच विविध परराज्यांमधून तीन ते चार लाखांहून अधिक भाविक भक्त दर्शनासाठी येतात.
यावर्षीच्या पावसामुळे बीड ते कपिलधार जाणारा मुख्य रस्ता गंभीरपणे खचला असून, सध्या मांजरसुंबा मार्गे जाणारा एकच रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. परंतु हा रस्ता अतिशय अरुंद व वळणदार असल्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि भाविकांच्या गैरसोयीची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, बीड जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाकडे कोळवाडी मार्गे जाणारा पर्यायी रस्ता तात्काळ दुरुस्त करून भाविकांसाठी खुला करण्याची मागणी  केली आहे
एकाच मार्गावर संपूर्ण वाहतूक होत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वा इतर आवश्यक वाहने अडकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, ही आम आदमी पार्टीची प्रशासनाकडे मागणी करण्यात आहे.
Comments
Post a Comment