बीड वार्ड क्र. 12 : सौ. राजश्री अशोक येडे यांची उमेदवारी दाखल
बीड वार्ड क्र. 12 : सौ. राजश्री अशोक येडे यांची उमेदवारी दाखल
आम आदमी पार्टीचा “झाडू” यंदा नगरपरिषदेत जोरदार फिरणार
बीड नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक 12 मधून आम आदमी पार्टीच्या सौ. राजश्री अशोक येडे यांनी महिलांच्या नेतृत्वाची ताकद दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केला. स्वच्छ प्रशासन, पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता आणि महिला विषयक प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.
सौ.राजेश्रीअशोक येडे या आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माजी सैनिक अशोक येडे यांच्या पत्नी असून, पक्षाच्या मजबूत नेतृत्वाखाली नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामध्ये—
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वृषाली जायभाये
शहराध्यक्ष नितीन जायभाये
जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण
शहर सचिव मिलिंद पाळणे
सामाजिक कार्यकर्त्या किस्किदाताई पांचाळ
लीगल सेल प्रमुख एड. नेहरकर
—यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
हजर कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात पक्षाच्या झाडू चिन्हाला भक्कम पाठिंबा दर्शवला आणि वार्ड क्रमांक 12 मध्ये विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.
Comments
Post a Comment