सामाजिक कार्यकर्त्या अंजली अहिरे यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर


सखाराम पोहिकर
गोवराई तालुका प्रतिनिधी 

ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या अंजली अहिरे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .
त्या ठाणे परिसरातील अनाथ मुलांना . वृद्ध लोकांना . त्यांच्या संस्थेच्या वतीने वर्षभर मदत करत असतात . या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक प्रकारचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत . 
 त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बीएसएफ बहुउद्देशीय संस्थेने त्यांना कृती गौरव पुरस्कार जाहीर केला . व हा पुरस्कार सोहळा 30 नोव्हेंबर रोजी श्री शेत्र शेगाव या ठिकाणी आपण उपस्थित रहावे अशी बीएसएफ बहुउद्देशीय संस्था . उपेक्षित नायक न्यूज व संकल्प बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कृती गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . 
हा पुरस्कार सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील श्री शेत्र शेगाव येथे होणार असून या पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक . पत्रकारिता . सामाजिक . कृषी . कला . अशा विविध क्षेत्रातील 50 मान्यवरांना प्रीती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . 
तेव्हा हा पुरस्कार सोहळा 30 नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे होणार आहे तेव्हा या पुरस्कार सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व पत्रकार क्षेत्रातील दिग्गज लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे .
या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी अशी माहिती दिली असून या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक भूषण सरदार यांनी ही माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी