स्मृतीशेष श्रावणदादा जगतकर यांच्या अस्थींचे शेतीमध्ये बोधीवृक्ष लावून विसर्जन
परळी प्रतिनिधी. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक स्मृतीशेष श्रावणदादा जगतकर यांचे नुकतेच निधन झाले होते.त्यांच्या अस्थींचे आज दिनांक 18 रोजी शेतामध्ये बोधीवृक्षाचे रोप लावून तिथे विसर्जन केले.
भीमनगर येथील श्रावणदादा जगतकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले होते.त्यांच्यावर काल शांतीवन स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते.पत्रकार बालाजी जगतकर यांचे ते वडील होते.त्यांच्या अस्थींचे आज त्यांच्या शेतात बोधीवृक्ष लावून त्या ठिकाणी अस्थींचे विसर्जन केले.यावेळी जगतकर कुटुंबिय उपस्थित होते.
Comments
Post a Comment