बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बोलावली बैठक



बीड (प्रतिनिधी) : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शहरातील सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात आज (दि.१६) सायंकाळी ४ वाजता बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, संभाव्य उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा होणार आहे. नगरपरिषद निवडणूक नियोजनबद्ध पद्धतीने लढविली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस स्थानिक कार्यकर्ते, इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी