राष्ट्रवादी पक्षाने आदेश दिलातर अजित पवार गटाचा ढाण्यावाघ शामराव हुले पारगाव जिल्हा परिषद रणांगणात उतरणार
पाटोदा (गणेश शेवाळे) अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे शामराव हुले पारगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पक्षाने आदेश दिल्यास,जनतेच्या सेवेसाठी व विकासासाठी रणांगणात उतरण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. शामराव हुले हे फक्त राजकारणी नसून, लोकांच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, गावोगाव परिचित असलेले समाजसेवक आहेत. पूरस्थिती असो वा दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची अडचण असो वा विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रत्येक वेळी त्यांनी तत्परतेने मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे पारगाव परिसरातील नागरिकांच्या मनात त्यांच्या नावाचा एक वेगळा ठसा उमटलेला आहे.गेल्या काही वर्षांत त्यांनी “राजकारण हे सेवेसाठी असतं, सत्तेसाठी नव्हे” हा विचार अंगीकारून जनतेत काम केलं आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि शेतकरी वर्गीय समस्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या हुले यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढत आहे.आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाने आदेश दिल्यास, पारगाव गटात शामराव हुले मैदानात उतरतील आणि विकासाच्या नव्या युगाची सुरुवात करतील,असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.“जनतेचा विश्वास, सेवाभावाची ओळख आणि विकासाचं ध्येय — या तिन्हींचा संगम म्हणजे शामराव हुले”, असा जनतेतून उमटणारा स्वर आहे
Comments
Post a Comment