आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची गुरुवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता,आष्टी तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा
आष्टी (प्रतिनिधी--गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी वैकुंठवासी ह.भ.प. श्री.संत बाळूदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १६ ऑक्टोबर ते २३ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व जगतगुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा संपन्न होत असून, या मध्ये पहाटे काकडा, पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, हरीकिर्तन व हरीजागर असे कार्यक्रम होत असून या सप्ताहाचे हे ४८ वे वर्ष असून या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ गुरुवार रोजी सकाळी १० ते १२ या वेळात ह.भ.प.पांडुरंग महाराज उगले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार असून, या अखंड हरिनाम सप्ताहात महाप्रसाद श्री नामदेव विठोबा शेळके (सामाजिक कार्यकर्ते ) व नागेश भगवान शेळके यांची पंगत राहणार असून या काल्याच्या कीर्तनाचा आष्टी तालुक्यातील सर्व नागरिक/ माता -भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळूदेव महाराज सप्ताह कमिटी , समस्त ग्रामस्थ मंडळी व बाळूदेव महाराज भजनी मंडळ धानोरा (तालुका आष्टी ) यांनी केले आहे .
Comments
Post a Comment