जिव्हाळा बेघर निवारा केंद्रामध्ये वाढदिवस साजरा करून गायकवाड परिवाराने पाडला नवीन पायंडा
बीड प्रतिनिधी, शहरात असलेल्या “जिव्हाळा बेघर निवारा केंद्र” यामध्ये गायकवाड दांपत्याने त्यांचा मुलगा रणवीर कुणाल गायकवाड याचा दुसरा वाढदिवस साजरा करून एक नवीन पायंडा पाडल्याचे पहावयास मिळाले. आपले आनंदाचे क्षण आपण केवळ एकट्यात न साजरे करता ते सामुहिक तसेच सामाजिक पद्धतीने साजरे करावे. त्यामुळे समाजात एक आदर्श तर निर्माण होईलच त्याचबरोबर मुलांना समाजाप्रती जाणिवेचे संस्कार ही घडतील.रणवीर गायकवाड याचा हा दुसरा वाढदिवस असताना, बेघर लोकांसोबत कसलाही बडे जाऊ पणं न करता हा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच केक कापणे या प्रथेला देखील नकार या वाढदिवसातून देण्यात आला.
यावेळी बीड शहर बचाव मंचाचे डी.जी तांदळे सर,बाजीराव ढाकणे,नितीन जायभाये, दैनिक बीड प्रसाराचे संपादक समीर काझी, पत्रकार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment