प्रत्यक्ष जनतेत काम करणाऱ्या ऍड.शोभा ताई सुनिलकाका लोमटे याच अंबाजोगाई नगराध्यक्ष पदासाठी पात्र उमेदवार.



अंबाजोगाई (अश्विनी लोमटे यादव )
नुकतेच संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले.अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी झाले जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाली.त्यातच भारतीय जनता पक्षाकडून श्रीमती. ऍड.शोभाताई सुनिलकाका लोमटे यांच्या नावाची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक तसेच राजकीय जीवनामध्ये कार्यरत असणाऱ्या ऍड. शोभाताई सुनिल (काका) लोमटे यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनता पक्षात केली.
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र सेविका समिती, हिंदुत्ववादी चळवळीचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या प्रत्यक्ष जनतेत काम करत असल्यामुळे शहरात व शहराबाहेरही सर्वत्र परिचित आहेत. प्रत्येकाच्या अडीअडचणीत-सुखदुःखात धावून जाणे, जनतेची कामे धसास लावणे ,सर्वांशी आपुलकीने वागणे, सर्वधर्मसमभाव जपणे या गोष्टींमुळे त्या समाज प्रिय आहेत.आणि विशेष म्हणजे कायद्याची पदवी प्राप्त असलेल्या रणरागिणी ला मानणारा अंबाजोगाई शहरात मोठा वर्ग आहे. 
त्यामुळे आत्ताच्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या त्या भक्कम उमेदवार ठरू शकतात. ही काळया दगडावरील पांढरी रेष आहे.सध्या त्या मा.मंत्री पंकजाताई साहेब मुंडे,आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वात समाजसेवेचे काम करतात. त्यांना सासरे माजी नगराध्यक्ष कै.बालासाहेब (तात्या) लोमटे,पती भा.ज.प.चे जिल्हा पदाधिकारी स्व. सुनिल (काका) लोमटे यांच्या कार्याचा वारसा आहे.श्रीमती ऍड.शोभाताई सुनिलकाकालोमटे या प्रत्यक्ष जनतेत काम करणाऱ्या तसेच संपूर्ण शहराला परिचित असलेला खुल्या प्रवर्गातील दुसरा महिला चेहरा भारतीय जनता पक्षाकडे नाही.
म्हणून अंबाजोगाई नगरपरिषद नगराध्यक्षपदाची उमेदवारी ऍड.श्रीमती शोभाताई सुनिल (काका) लोमटे यांनाच मिळू शकते अशी संपूर्ण शहरात चर्चा आहे. 

ऍड.शोभाताई सुनिल (काका) लोमटे यांचे सामाजिक व राजकीय काम•

•गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे जिल्हा पदाधिकारी स्व. सुनिल (काका) लोमटे यांच्या समवेत प्रत्यक्ष समाजकार्यात आणि राजकीय जीवनात कार्यरत. 

•शासनामार्फत राबविलेल्या घरोघरी शौचालय, रमाई आवासचे घरकुल, उज्वला गॅस या योजनेमार्फतचे गॅस कनेक्शन असंख्य गरीबांना मंजूर करून दिले. 

.त्या त्या खात्याकडे पाठपुरावा करून विविध प्रभागातील रस्ते नाल्या मंजूर व तात्काळ तयार करून घेतले. 

•वेळोवेळी विविध परिसरातील पथदिवे बदलून घेतले व आजही ते घेतले जातात जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. 

•शहरातील विविध परिसर स्वच्छ करण्यासाठीचा पाठपुरावा कायम असतो

• शहरातील विधवा महिला, घटस्फोटीत महिला यांच्यासह जे खरंच दारिद्र्यरेषेखाली येतात अशा नागरिकांना बीपीएल राशन कार्ड पाठपुरावा करून उपलब्ध करून दिले. तसेच राशन दुकानदारांचा पाठपुरावा करून नागरिकांना राशन उपलब्ध करून दिले.

•निराधार,श्रावण बाळ यासाठी पात्र असलेल्या नागरिकांचे शासनाकडे पाठपुरावा करून पगारी सुरू करण्यात आल्या. 

•सरकारी, खाजगी दवाखान्यामध्ये नागरिकांना अत्यावश्यक मदत लागल्यास उदा.रक्त, तातडीचे विविध उपचार, प्रसूती संदर्भातील अडचणी अपघात अशा प्रसंगी वेळोवेळी उपस्थित राहून नागरिकांची मदत करण्यासाठी पुढाकार

• नगरपालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न.

•तहसील,पोलीस ठाणे, यासह इतर सरकारी कार्यालयामध्ये नागरिकांना काही अडचण असेल तेव्हा नागरिकांची मदत केली जाते.

•बालविवाह हुंडाबंदी यासारख्या प्रथांविरुद्ध नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. 
•शासनाने राबवलेल्या कामगार योजनेमार्फत नागरिकांना लाभ मिळून दिला जातो. 

• विविध नागरिकांमध्ये जनजागृती करणे.

•मतदान नाव नोंदणी शिबिर आयोजित करणे. 
•महामानवांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करणे. 

नागरिकांची काही अडचण असेल तर एका फोनवर उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करणे.अशा अनेक गोष्टी विधिज्ञ ऍड.शोभाताई सुनिल (काका) लोमटे या सातत्याने करतात.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी