बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे - डॉ. स्नेहा सोनकाटे ओबीसी नेत्या
बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे - डॉ. स्नेहा सोनकाटे ओबीसी नेत्या
शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात होणार ओबीसींचा महाएल्गार!
बीड प्रतिनिधी .अंकुश गवळी
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 : 00 वाजता बीड येथे ओबीसी महाएल्गार सभेचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी महाएल्गार सभेला ओबीसी समाज बांधव, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे आव्हान डॉ. स्नेहा सोनकाटे यांनी केले आहे
शुक्रवार दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 : 00 वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाएल्गार सभा होणार असून याप्रसंगी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब,माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे, आ. गोपीचंद पडळकर, मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, प्रा. लक्ष्मण हाके, ज्येष्ठ साहित्यिक तथा भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मणराव गायकवाड, शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे, सयाजी झुंजार, राजाराम पाटील, नवनाथ वाघमारे, ॲड. मंगेश ससाने, वंजारी समाजाचे नेते सत्संग मुंडे, ईश्वर बाळबुधे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ओबीसी आरक्षण अखंडित राहावे, ओबीसींच्या लेकरांना आरक्षणाचा लाभ मिळावा, ओबीसी समाजातील लेकरांच्या भवितव्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सदरील महाएल्गार सभा होणार असून ओबीसी समाज बांधव, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. स्नेहा सोनकाटे ओबीसी नेत्या यांनी केले आहे
Comments
Post a Comment