अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे टाळ-मृदंगासह निदर्शने
अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे टाळ-मृदंगासह निदर्शने — डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश :-(दि.१३)परळी शहरातील सिद्धेश्वरनगर येथील “नर्मदेश्वर गुरूकुल” या वारकरी शिक्षण संस्थेतील ११ बाल वारकऱ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेधार्थ आणि आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर आज दि.१३ सोमवार रोजी सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात "ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात"निदर्शने करण्यात आली.
अध्यात्म आणि संस्कार शिकवणाऱ्या बाल वारकऱ्यांवरील हल्ला अत्यंत दुर्दैवी असून वारकरी संप्रदायावरचा हा हल्ला सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या निदर्शनानंतर पोलीस अधिक्षक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री बीड ,पोलिस महासंचालक परीक्षेत्र संभाजीनगर,यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, कल्याण वाणी,शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, अँड.गणेश वाणी, विक्रांत वाणी वारकरी संप्रदायातील ह.भ.प. अनंत काका मुळे,पांडुरंग वाणी, मोहनराव कोटुळे, बाजीराव साखरे, छबु मांगलकर,दामोदर थोरात, राजेंद्र मंडलिक,बंडु जाधव, गणपत तागड, आबासाहेब कानिटकर,आजिनाथ वाणी, महावीर वाणी,सोमीनाथ फाळके,माणिक वायभट, नामदेव शिंदे, राजेंद्र कानिटकर, अंकुश जाधव,आदी
सहभागी होते .
परळीतील गुरूकुलात ११ बाल वारकऱ्यांना बेल्ट व बांबूने मारहाण करून त्यांच्यावर गंभीर जखमा केल्याची घटना घडली असून गुरूकुल संचालक अर्जुन शिंदे यांचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही हल्ला झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे.
गुरूकुलातील अध्यात्मिक साहित्य, मृदुंग आणि शैक्षणिक ग्रंथांची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली.
Comments
Post a Comment