देशसेवेपासून समाजसेवेपर्यंत! मेजर हनुमंत सानप पारगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात
पाटोदा (गणेश शेवाळे)महाराष्ट्र राज्यातील माजी सैनिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या त्रिदल संघटनेच्या वतीने मेजर हनुमंत सानप पारगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत.
देशाच्या सीमारेषेवर उभे राहून अनेक वर्षे राष्ट्रसेवा केलेले मेजर सानप आता आपल्या मातीत परत येऊन समाजसेवेचा ध्यास घेत आहेत.रिटायरमेंटनंतरही “सेवा” हीच त्यांची ओळख ठरावी या भावनेतून त्यांनी विकासाचा संकल्प घेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरायचे ठरवले आहे. पारगाव गटातील विकास, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ठोस बदल घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.त्रिदल संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत, राष्ट्रसेवेचा जोश ग्रामविकासात उतरवण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले आहे.
मेजर हनुमंत सानप यांच्या उमेदवारीने पारगाव परिसरातील राजकीय समीकरणात चैतन्य निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment