"वर्षावास" काळात "बुद्ध आणि त्यांचा धम्म"ग्रंथाचे वाचन अंतर्मनातून करून तसे आचरण करणे गरजेचे - पूज्य भिक्खू धम्मशील थेरो

"वर्षावास" काळात "बुद्ध आणि त्यांचा धम्म"ग्रंथाचे वाचन अंतर्मनातून करून तसे आचरण करणे गरजेचे - पूज्य भिक्खू धम्मशील थेरो

नागसेन बुद्ध विहार येथे वर्षावास धम्म ग्रंथ वाचन समापन कार्यक्रम उत्साहात संपन्न 
 बीड (प्रतिनिधी) 2500 वर्षापूर्वी तथागतांनी श्रावस्ती, राजगृह, वैशाली, नालंदा अशा विविध ठिकाणी आपल्या देशनेतून मानव कल्याणाकरिता प्रज्ञा,शील,अष्टांगिक मार्ग व मैत्री, करुणा, दान पारमिता बद्दल बहुमोल उपदेश केला. तीच परंपरा भिक्खू संघाने पुढे चालू ठेवून वर्षावासातील 3 महिने तथागतांचा उपदेश परिसरातील उपासक,उपासिकांना विहारात राहून समजावून सांगत असत. अभ्यासाअंती खूप मेहनत घेऊन डॉ. बाबासाहेबांनी तथागतांचा बहुमोल उपदेश "बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ" या ग्रंथाद्वारे सर्वसामान्यांना समजावा म्हणून लिखित स्वरूपात जो की त्यांचा शेवटचा लिहिलेला ग्रंथ आहे. वर्षावासातील या ग्रंथाचे वाचन हे केवळ वाचन न करता ते वाचन अंतर्मनातून करून तसे आचरण करणे कसे मानव कल्याणाचे आहे हे अनेक उदाहरणाद्वारे नागसेन बुद्ध विहार धानोरा रोड बीड येथे धम्मग्रंथ वाचन समापन प्रसंगी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मधुर वाणीतून उपस्थित उपासक उपासिका यांना बालक बालिकानां धम्मदेशने द्वारे सांगितले. सर्वप्रथम भिकखू धम्मशील थेरो भिकखु धम्मबोधी शिवनी यांची कृषी कॉलनी ते नागसेन बुद्ध विहार सवाद्य रॅली काढण्यात आली. विहारात आगमन झाल्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पूज्य भन्ते धम्मशील थेरो यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम आदर्शाची पूजन भन्तेच्या हस्ते करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विहार कमिटीतर्फे महिला उपोसकांनी पूज्य भंतेचे पुष्पगुच्छ देऊन त्रिवार वंदन करून स्वागत केले.
 कार्यक्रमाचे प्रस्ताविक बौद्धाचार्य ज्ञानोबा पोटभरे यांनी केले तर सूत्रसंचालन से. नी वरिष्ठ शाखा प्रबंधक एल.आय. सी बीड आयु. यु एस वाघमारे यांनी केले. याप्रसंगी श्री परमेश्वर बनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचाराने चालण्याचे महत्त्व विशद केले. आपल्या देशनेत पूज्ज भन्ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुमोल उपदेशांचा सखोल विचार करून विचारपूर्वक प्रत्येक रविवारी
बौध्दानी सहकुटुंब विहारात यावे आणि मनाला सुख ,शांती , समाधान देणाऱ्या धम्माचे तत्व
आगींकारुण आपले जीवन समृद्ध करावे आणि बुध्द धम्माचा प्रचार व प्रसार करणारी चळवळ आधिक 
गतीमान करण्यासाठी आपले 
योगदान द्यावे.
केशरताई त्रिंबकराव कांबळे यानी उपस्थिता प्रती आभार व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील व शहरातील बहुसंख्य उपासक,उपासिका बालक-बालिकांची उपस्थिती होती शेवटी सरणत्तयने व भोजन दानाने कार्यक्रमाची
सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी