सकल हिंदू समाजाच्या वतीने गोहत्याविरोधी निषेध सभा यशस्वीरीत्या पार पडली

सकल हिंदू समाजाच्या वतीने गोहत्याविरोधी निषेध सभा यशस्वीरीत्या पार पडली

आई भवानीचा आशीर्वादाने हिंदू धर्माचा कार्याला सुरवात

सकल हिंदू समाज व डॉ. रुपेश नाठे यांच्या पुढाकाराने हिंदू समाजाच्या आक्रोशाला न्याय देण्यासाठी आयोजित गोहत्याविरोधी निषेध सभा मोठ्या उत्साहात आणि जाज्वल्य हिंदुत्वभावनेने पार पडली.
या सभेला भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते अजितजी चव्हाण, छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, शिवसेना नेते निवृत्ती जाधव, तालुका प्रमुख राजू नांठे, माजी उपसभापती हरिश्चंद्र नाठे, तसेच गोपाळा लहांगे, तुकाराम वारघडे, सरपंच भाऊसाहेब धोंगडे, केरु चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

अलीकडेच बेलगाव कुर्हे येथे गुळवे नामक व्यक्तीने अवैध कत्तलखाना चालवून सुमारे १०० पेक्षा अधिक गोमातांची निर्दय हत्या केल्याने हिंदू समाजात संतापाची लाट उसळली होती. स्थानिक गोरक्षकांच्या तत्परतेने पोलीस प्रशासनाने ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि १०० हून अधिक गाई-नंदी ताब्यात घेतले, तसेच आरोपींना अटक केली. तथापि, अवघ्या काही दिवसांत आरोपींना जामीन मिळाल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.

भाजप प्रवक्ते अजितजी चव्हाण म्हणाले, “मी सत्ताधारी पक्षाचा असलो तरी धर्मविरोधी कृत्य करणाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही. हिंदूंच्या श्रद्धेवर आघात करणाऱ्यांवर ‘म.को.का.’ अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. धर्म रक्षणासाठी आम्ही सर्व एकजुटीने उभे राहू.”

छावा क्रांतिवीर सेना प्रमुख करण गायकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आपल्या मातृभूमीत जर गाईंची कत्तल होत असेल आणि त्याला राजकीय अभय असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. रुपेश, तुझ्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ज्या भूमीवर आपली माऊली पुरली गेली, त्या ठिकाणी गोमातेचे मंदिर उभे राहील.”

स्वराज्य जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “गोमाता ही आपल्या धर्माची अधिष्ठात्री आहे. तिच्या अंगी ३३ कोटी देवतांचे निवासस्थान आहे. तिच्या रक्षणासाठी लढणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. हे फक्त आंदोलन नाही तर धर्मयुद्ध आहे — धर्म टिकवण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांना हिंदुत्वाचा अभिमान देण्यासाठी.”आत्ता ५० मुलांची टिम तयार करून धर्म कार्याची सुरुवात करुयात.

या कार्यक्रमात अजय कश्यप,रोहीदास टिळे, समाधान मते, गणेश मते, विनोद जाधव, विकास कोंढुळे, विकास मते, नवनाथ नाठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
गोमाता ही केवळ प्राणी नसून ती धर्म, संस्कृती आणि मानवतेचे प्रतीक आहे. तिच्या रक्षणातच राष्ट्ररक्षण दडले आहे. हिंदू समाजाने आज ठरवले आहे — “गोहत्येला नाही, धर्मरक्षणाला होकार!”

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी