जीवनातील विविध प्रसंग,घटना अचुक सांगणारे लोखंडे महाराज


पाटोदा (प्रतिनिधी)
राजेंद्र महाराज लोखंडे या अवलियाला एक अदभुत किमया अवगत आहे.लोखंडे महाराज आपल्या
अदभुत लॉजीकने पुढील व मागील अनेक वर्षमधील
सणावारांच्या तारखा अगदी अचुकपणे सांगतात. एवढेच नाही तर समोरील माणसांच्या
जन्मतारखा देखील वारासह सांगतात.
पाटोदाजवळ असलेल्या दिघोळ येथील राजेंद्र गंगाराम लोखंडे हे काही वर्षांपूर्वी शिक्षण व कामाच्या निमीत्ताने
पाटोदा शहरात आले आणि येथेच स्थायिक झाले.
शाळेत असल्या पासुनच राजेंद्र लोखंडे हे अध्यात्मिक
वृत्तीचे आहेत. काहीसे गुढ वागत, त्यावेळी खेमानंद
महाराज यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले होते. पाटोद्यात आल्यानंतर त्यांनी एम.ए.पर्यंतचे आपले शिक्षण
पूर्ण करून काही काळ ह.भ.प. रामकृष्ण रंधवे
महाराज यांच्या संस्थेत नोकरी ही केली मात्र त्यांच्या
अध्यात्माकडेच अधिक कल राहीला. महाराज ब्रम्हचारी आहेत.दरम्यान त्यांच्या या गुढ
वागणुकीतुनच त्यांच्यातील अनोख्या तर्कशक्तीची जाण होऊ लागली.एकादा अनोळखी व्यक्ती जरी त्यांच्यासमोर गेला आणि त्यांना वाटले तर ते
व्यक्तिची जन्मतारीख वारासह अगदी अचुकपणे
सांगतात.त्यांच्या तारखेच्या तर्कशास्त्रानुसार त्या
व्यक्तिच्या जीवनात भविष्यत घडू शकणाऱ्याही काही
घटनांचा वेध सांगु शकतात.वर्तविलेले अंदाज खरे ठरू लागले आहेत.माजी मंत्री आ.धनजंय मुंडे व लोकनेत्या
पंकजाताई मुंडे हे बहीणभाऊ मार्च २०२४ मध्ये
राजकारणात एकत्रीत येतील असा २०२० साली
(चार वर्षापुर्वी) भविष्य सांगणारे लोखंडे महाराज
आहेत.मानवी जीवनातील गूढ वागुणुकीचे तर्कशास्त्र लोखंडे महाराज यांना अवगत आहे. मनुष्याचा फक्त
चेहरा पाहून ते जन्मतारखेपासून, मृत्युच्या तारखे
पर्यंतचा जीवनपट सांगतात,लोखंडे महाराजांनी
राज्याच्या व बीड जिल्हयाच्या राजकारणावर आपले अंदाज व मत नोंदवले २०४० साली नोव्हेंबर
महीन्यात ४ तारखेला दिवाळी आहे.त्यादिवशी
रविवार असेल, २०५५ साली २४ फेब्रुवारी रोजी
महाशिवरात्री बुधवार रोजी असेल, १९४७ साली ६
मार्च रोजी होळीचा सण होता.तो दिवस बुधवारचा होता.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य
मिळाले तो वार शुक्रवार होता अशा प्रकारे पुढील व मागील ५० वर्ष आणि त्याहीपेक्षा अधिक वर्षातील
सणांच्या तारखा अगदी क्षणात कुणी बिनचुक सांगु शकेल यावर कोणाचा चटकन विश्वास बसणार नाही
मात्र पाटोदा येथील राजेंद्र महाराज लोखंडे या
अवलियाला मात्र ही अदभुत किमया अवगत आहे.
पाटोदा तालुक्यातील महासांगवी गावाकडे जाणाऱ्या रोडवर लोखंडे महाराज राहतात.बालवयात लोखंडे महाराजांवर धार्मिक संस्कार झाले असल्यामुळे
अध्यात्माची चांगल्या प्रकारे त्यांना आवड निर्माण झाली आहे. भगवान शंकराचे ते भक्त आहेत.त्यांना
भविष्य जाणण्याची विद्या प्राप्त झाली आहे.माणसाचा
जन्मदिनांक,
वेळ,तारीख ते अचूकपणे सांगतात. आपल्याकडे
हस्तरेषा किंवा चेहरापाहून भविष्य सांगणारी माणसं
आहेत पण ज्योतिष शास्त्राचा कसलाही अभ्यास न करता लोखंडे महाराज माणसाच्या जीवनाबाबत ज्या
गोष्टी सांगतात हे मात्र आश्चर्यपेक्षा कमी नाही.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी