दिपदान कार्यक्रम म्हणजेच दीपावली.......!
दिपदान कार्यक्रम म्हणजेच दीपावली.......!
हिंदुधर्मातील अनेक मंदिर हे बौद्ध स्तूप आहेत पण त्यावर अतिक्रमण करून ते बौद्धाची स्तूप हिंदु मंदिरात रुपान्तरीत केलेली आहेत. काही बुद्ध परंपरा ही चोरल्या गेलेल्या आहेत भारत ही बुध्दाची जननी आहे. इथे बुद्धाचा वावर झालेला आहे. इथेच बुध्दाची विरासत आहे. बुद्ध प्राचीन सनातन म्हणजे अनादी काळापासून चालत आलेला आहे. तो देव नसून एक मार्गदर्शक मार्गदाता आहे तो धर्म नसून धम्म आहे. अखंड भारतात जेंव्हा सम्राट अशोकाचे राज्य होते त्याकाळी जगाला युद्ध सोडून बुद्ध हवा असा साक्षात्कार चक्रवर्ती सम्राट अशोकाला झाला हातातून शस्र टाकून दिली आणि सम्राट अशोक राजा बुद्धाला शरण गेला. आणि त्याने बुद्ध धम्म स्वीकारला. त्याने ठरवलं ह्याच बुद्ध धम्माला वाढवायचं मोठ करायचं त्याने भिक्कू संघाला प्रचारक म्हणून प्रस्थापित केले आणि चारही दिशेने पाठवले. त्याने त्याकाळी कुशल कारागीर बोलावून चौर्याऐंशी हजार बुद्धस्तूप तयार केली त्यात बुद्ध विहार, बुद्ध मुर्त्या, बुद्ध स्तूप तयार केली आणि बुध्दाची विचार सांगण्यासाठी भिक्कू संघ तयार केला. आणि ह्याच चौर्याऐंशी हजार बुद्ध स्तुपाचे उदघाटन आणि अनावरण कार्तिक आमावस्सेला ह्याच दिवशी साजरा केला जातो हा दिपदान उत्सव म्हणजे दिव्याला दान करून आंधकारमय जीवनातून प्रकाशमय ज्ञानात प्रवेश करणे होय कारण ह्याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झाले त्यांना सम्यक ज्ञान प्राप्त झाले होते त्याच बरोबर सम्राट अशोकाने चौर्याऐंशी हजार बौद्ध स्तूप बौद्ध ज्ञानदानाच्या हेतूने लोकांना समर्पित केले होते म्हणून दिपदान, दिव्यांची माळ लावून घर दार विहार स्तूप प्रकाशमान करुण साजरा केला जातो.प्रत्येकाने घरातून दिवा आणण्याचा आणि स्तुपासमोर ठेवायचा आणि बुद्धसूत्त पठण करायचे बौद्ध ज्ञान आत्मसात करायचे असा रिवाज पडला. आज तोच दीपदान उत्सव दीपावली म्हणून साजरा केला जातोय ही बुद्ध धम्म परंपरा पुढे हिंदूंनी मंदिरात आणली आणि दिपदान महोत्सव दीपावली म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा सम्राट अशोकाचा ज्ञान दानानाचा बुद्ध स्तुपाचा आणावारणाचा दिवस आहे ह्यादिवशी बुद्धाचे विचार जगाला सांगीतले गेले पाहिजेत असा रिवाज आहे.कारण कलिंग राज्याशी युद्ध करून त्यात झालेल्या नर संहराला पाहून सम्राट अशोका युद्ध जिंकूनही अस्वस्थ होता कारण भरपूर लोक धारातीर्थी पडले होते. जिकडे तिकडे रक्तपात पाहून चक्रवर्ती सम्राट अशोक अस्वस्थ झाले आणि नंतर या जगाला युद्ध नको बुद्ध हवा असा संदेश देऊन त्यांनी बुद्धधम्म स्वीकारला. तो वाढवला आणि जगाच्या कानकोपऱ्यात पोहचवला.....
लेखन-डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर,संपर्क-9922541030
Comments
Post a Comment