आमदार धस आण्णा एकदा ह्या निष्ठावंत शिलेदारांना निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची संधी द्याच
आमदार धस आण्णा एकदा ह्या निष्ठावंत शिलेदारांना निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची संधी द्याच
अंमळनेर गटात भाऊसाहेब भवर, तर डोंगरकिन्हीत अनिलशेठ काथवटे आमदार धस यांच्या निष्ठावंत शिलेदाराची चर्चा
पाटोदा (गणेश शेवाळे) राजकारणात सत्ता येते-जाते, पण निष्ठा आणि निःस्वार्थ कार्यकर्त्यांचा आदर कायम राहतो. आजही आमदार सुरेश आण्णा धस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही निष्ठा जिवंत आहे.
सत्ता असो या नसो, पद असो वा नसो कायम तुमचा निर्णय अंतिम म्हणून काम करणार्या एकदा ह्या निष्ठावंत शिलेदारांना रणांगणात उतरण्याची संधी द्याच!”हीच जनतेची अपेक्षा
अंमळनेर जिल्हा परिषद गटात भाऊसाहेब भवर हे कार्यकर्ते सतत आमदार धस यांच्या विचारधारेवर चालत, संघटनात प्रावीण्य दाखवत आणि गावपातळीवर विकासाची नवी दिशा दाखवत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरलेला आहे,आणि आता रणांगणात उतरायला त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे डोंगरकिन्हीत जिल्हा परिषद गटात अनिलशेठ काथवटे हे कार्यकर्ते देखील आमदार धस यांचे कट्टर समर्थक आहेत. गावागावातील समस्यांवर ठामपणे काम करणारे, संघटनशक्ती असलेले आणि जनतेच्या हितासाठी सतत प्रयत्न करणारे काथवटे हे रणांगणात उतरायला सज्ज आहेत.मात्र आमदार धस आण्णाचा आदेश अंतिम देतील आणि आण्णाने आदेश दिला तरच रणांगणात उतरणार!” यामुळे आज अंमळनेर ते डोंगरकिन्हीपर्यंत चर्चा रंगली आहे की, निष्ठावंत शिलेदारांना संधी दिली, तर रणांगण गाजेल!
जनतेतूनही या कार्यकर्त्यांवर विश्वास दिसतोय. विकासाची दृष्टी, नेत्यावरील निष्ठा आणि काम करण्याची क्षमता या गुणांमुळे भवर आणि काथवटे यांना संधी देणे आवश्यक ठरले आहे.
“नेता आदेश देतो; संधी दिली की शिलेदार रणांगण जिंकतो!” हीच आजच्या राजकारणातील खरी लढाई आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना मान्यता मिळावी, तरच विकासाची मशाल उजळू शकते.भाऊसाहेब भवर आणि अनिलशेठ काथवटे हे दोघेही आमदार धस यांच्या विचारधारेचे खरे शिलेदार आहेत.आण्णांचा आदेश आणि जनतेचा आशीर्वाद मिळताच रणांगण सज्ज होईल, आणि विजय पुन्हा एकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हातात असेल, अशी चर्चा सध्या जोरात आहे.
Comments
Post a Comment