शासकीय सेवेतील आदर्श अधिकारी पूरस्थितीत मंडळ अधिकारी अशोक दराडे व तलाठी राहुल भरणे यांचे उल्लेखनीय कार्य
पाटोदा (प्रतिनिधी)शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण म्हणजे मंडळ अधिकारी अशोक दराडे व तलाठी राहुल भरणे यांचे कार्य. संकटाच्या काळात जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि जबाबदार वृत्ती आदर्श ठरली आहे.पूरग्रस्त भागात घराघरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे, अन्न, पाणी व आरोग्य सेवांची सोय करून देणे तसेच शासनाच्या मदतीचा प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तात्काळ पोहोच होण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राहिली. प्रशासन, पोलिस, ग्रामपंचायत व स्वयंसेवक यांच्या संयुक्त समन्वयातून पूरग्रस्त भागात वेळेत मदत पोहोचवून जनतेचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी ठरले.ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनीही अशोक दराडे व राहुल भरणे यांच्या प्रामाणिक कार्यनिष्ठा, जनसेवा भाव आणि शासकीय कार्यक्षमतेचे मनापासून कौतुक केले आहे.
“अशा अधिकारीवर्गामुळेच शासन खर्या अर्थाने जनतेच्या सेवेत कार्यरत आहे,” असा प्रतिसाद स्थानिकांनी दिला.
Comments
Post a Comment