वाचन संस्कृती जोपासून सुसंस्कृत पाल्य घडविणे पालकांचे कर्तव्य :-प्रो. डॉ. मनोहर सिरसट
( प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमाने संपन्न )
बीड (प्रतिनिधी) "वाचाल तर वाचाल" हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनमोल उपदेश लक्षात ठेवून वाचन संस्कृती जोपासून सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी पालकांनी लहानपणीच आपल्या पाल्यांच्या हातात चांगली पुस्तके देऊन आपले पाल्य सुजाण,सदाचारी नागरिक बनण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे ; माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त हेच खरे अभिवादन ठरेल असे प्रतिपादन प्रो. डॉ. मनोहर सिरसट यांनी केले. महामानव अभिवादन ग्रुप संचलित मोफत शिकवणी वर्ग प्रकाश आंबेडकर नगर बीड येथे "वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयातर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची संयुक्त जयंती विविध उपक्रमाने संपन्न करून "वाचन प्रेरणा दिन" साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास अध्यक्षपदी से.नी. सी.ई.ओ( जि. प )आयु.पी व्ही बनसोडे तर प्रो.डॉ. मनोहर सिरसट,प्रो डॉ. उपप्रचार्य उत्तमराव साळवे, सिद्धार्थ शिनगारे व एस. एस सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विचार पिठावर महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले, समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्राध्यापक अशोक गायकवाड व ॲड तेजस वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम आदर्शांची पूजा करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम व दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प व पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक "वाचाल तर वाचाल" चे आयु डी.जी वानखेडे यांनी केले तर सूत्रसंचालन डी. एम राऊत यांनी केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली होती त्या स्पर्धेतील प्रथम बक्षीस 1000 रुपये प्रा. डॉ. नामदेव शिनगारे, द्वितीय बक्षीस 700 रुपयांची स्पर्धा परीक्षेकरिता उपयोगी 11 पुस्तकांचा संच "वाचाल तर वाचाल" तर्फे,तिसरे बक्षीस 500 रुपये पी. व्ही बनसोडे यांनी दिले व 8 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रत्येकी 100 रुपये बक्षीस समाजसेवक प्रशांत वासनिक व यु एस वाघमारे यांच्यातर्फे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तसेच 9 वी ते 12 वी वर्गातील खुल्या गटातील 3 विद्यार्थ्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचनालयातर्फे देण्यात आला. ह्या प्रसंगी वाचन प्रेरणा दिना बद्दल,भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवा बद्दल व संविधाना बद्दल तसेच पंचशीलाचे महत्व अस्खलित व मधुर आवाजात पंचशील म्हणून पालीचा मराठी अर्थ सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श महापुरुषांचे व महामातांचे जीवन चरित्र पुस्तके व पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मासिक घटक चाचणीतील गुणवंत 8 विद्यार्थ्यांना वही व पेनाचे वाटप करण्यात आले. वाचाल तर वाचाल चे पहिले केंद्र असलेल्या या केंद्रास आठव्या फेरीतील 50 पुस्तकांचा संच शिक्षिका विशाखा वाघमारे यांना सुपूर्द करण्यात आला "वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयाला प्रो.डॉ मनोहर सिरसट यांनी स्वलिखित महामानावाची पुस्तके, सुंबरण व आदर्श महापुरुषांची जीवन चरित्र अशी 11 पुस्तके वाचनालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना प्रो डॉ. उत्तमराव साळवे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षण घेऊन कर्तुत्वान बना व आपल्या कार्यातून तुमच्या हातून समाजसेवा घडो असा उपदेश केला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे उजवाहात समजल्या जाणाऱ्या थोर समाजसेवक दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीदिनी हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सर्वोत्परी महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचालच्या माध्यमातून मदत देण्याचे ठोस आश्वासन दिले.विचारवंत सिद्धार्थ शिनगारे यांनी इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण,वैज्ञानिक दृष्टिकोनाची जीवनशैली व उच्च ध्येय डोळ्यसमोर ठेऊन ते कसे प्राप्त कसे करावे याबद्दल डॉ. बाबासाहेब यांच्या जीवनातील वाचणाच्या व ग्रंथाच्या सहवासातील अनेक प्रसंग सांगितले. अध्यक्षीय समारोपात बनसोडे पी.व्ही यांनी मोलाचा उपदेश देताना म्हणाले की मोफत शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना लागलेली वाचनाची गोडी व प्रगती बघून समाधान व्यक्त केले व मुलांनी पुस्तकाच्या सहवासात राहून आपल्या ज्ञानात भर घालावी तसेच आपण केलेल्या वाचनाचे मुद्देसूद टिपणं ठेवावे म्हणजे ते पुढील स्पर्धा परीक्षे करिता उपयोगी येतील.
कार्यक्रमास परिसरातील विद्यार्थी, पालक व उपासक उपासिका यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.जगदीश वाघमारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशिक जाधव, रसिका जाधव यांनी कष्ट घेतले शेवटी सरणात्तय व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment