लिंबागणेश जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन” साजरा

लिंबागणेश जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन” साजरा – डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
लिंबागणेश :- (दि.१५):भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बीड तालुक्यातील लिंबागणेश जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमामागचा उद्देश वाचन संस्कृती वाढवणे, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे, ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाज घडविणे हा आहे. राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय शैक्षणिक संस्था दरवर्षी या दिवशी विविध वाचन उपक्रम राबवतात, तर काही ठिकाणी १५ ते २२ ऑक्टोबर या आठवड्यात “वाचन प्रेरणा सप्ताह” सुद्धा साजरा केला जातो.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक दीपक घाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, पत्रकार हरिओम क्षीरसागर याची उपस्थिती होती.सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा गीते उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा अयाचित यांनी केले तर आभारप्रदर्शन श्रीमती ज्योती सानप यांनी केले.

या प्रसंगी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करून देत “चांगले पुस्तक हे शंभर मित्रांसारखे असते” या उक्तीवर आधारित वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके तसेच महान व्यक्तींच्या सचित्र चरित्रांचे वाचन केले.

मुख्याध्यापक दीपक घाटे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या विद्यार्थ्यांबद्दलच्या प्रेमभावनेची आणि कार्याची ओळख करून दिली.

डॉ. गणेश ढवळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आजची पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने पुस्तकांपासून दूर होत चालली आहे. चांगल्या पुस्तकांचा आणि विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो व आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. वाचनामुळे माणूस सर्वगुणसंपन्न होतो, त्यामुळे नव्या पिढीने पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.”



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी