आमदार सुरेश धस यांचे आदेश हनुमानाप्रमाणे पालन करणारा शिलेदार सरपंच पद्माकर घुमरे यांची पारगाव जिल्हा परिषद गटात जोरदार चर्चा


पाटोदा (गणेश शेवाळे)
जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण जाहीर होताच पारगाव जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण गरमावले आहे. या गटातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले असून, आमदार सुरेश धस आण्णा यांच्या आदेशाचे हनुमानाप्रमाणे पालन करणारे आणि त्यांचे खरे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे सरपंच पद्माकर घुमरे यांचे नाव आता जोरदार चर्चेत आहे.सुख-दुःखाच्या काळात आमदार धस यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणारे, आदेश दिला की तत्काळ पालन करणारे असे पद्माकर घुमरे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नाव जोरदार चर्चेत येत आहे. 
पद्माकर घुमरे हे कधीही जाती-पातीच्या राजकारणात न अडकता, फक्त आमदार सुरेश धस आण्णा यांचा फायदा आणि त्यांच्या कार्याला बळकटी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रामाणिकपणा,जनसंपर्क कौशल्य आणि प्रशासनासोबत समन्वय यामुळे ते स्थानिक जनतेमध्येही अत्यंत लोकप्रिय आहेत.जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी जोरदार चर्चा सुरू असुन स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आशा आहे आमदार सुरेश धस यांचे विचार प्रत्यक्षात साकार करण्यासाठी सरपंच पद्माकर घुमरे यांनी पारगाव गटात निवडणूक लढवावी सामाजिक बांधिलकी, जनहितासाठी काम करण्याची वृत्ती, आणि प्रामाणिकपणा या गुणांमुळे घुमरे हे या गटाचे विश्वासू नेता मानले जात आहेत. राजकारणात गैरफायदा किंवा स्वार्थ न बाळगता फक्त जनतेच्या हितासाठी झटणारे आणि आमदार धस यांच्या आदेशाचे पालन करणारे अशी त्यांची ओळख आहे.सर्वसामान्यांपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत, प्रत्येकजण पद्माकर घुमरे यांचे नेतृत्व आणि आमदार सुरेश धस यांच्यासोबतचे नाते याचा आदर करत असल्यामुळे पारगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सरपंच पद्माकर घुमरे यांच्या नावाची जोरदार चर्चा

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी