केजच्या कोरडेवाडी गावचा साठवण तलावासाठी 30 ते 35 वर्षांपासूनचा संघर्ष -स्वप्निल वरपे
प्रशासन कोरडेवाडी गावच्या ग्रामस्थांना न्याय देणार आहेत का.
केज प्रतिनिधी
कोरडेवाडी या गावचा गेली 30 ते 35 वर्षापासून साठवण तलावासाठी संघर्ष चालू आहे. केज तालुक्यातील शासन प्रशासन इथली संत्री मंत्री खासदार आमदार पुढारी आणि एक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील गावकऱ्यांना कॉल द्वारे आश्वासन दिले होते तरी देखील आतापर्यंत आश्वासन दिली पण पूर्ण कोणीच केले नाही.
कोरडेवाडी हे गाव गेले 30-35 वर्ष झाले कोरडेवाडी साठवण तलावाच्या मागणीसाठी लढत आहे आत्तापर्यंत या तालुक्याचे जिल्ह्याचे शासन प्रशासन अधिकारी प्रतिनिधी पुढारी संत्री मंत्री आमदार खासदार यांनी फक्त या गाववाल्यांना आश्वासन दिली पण पूर्ण काम कोणीच केले नाही आज गेली 30-35 वर्ष झालं हे गाव साठवण तलावासाठी संघर्ष करत आहे कारण या गावांमध्ये पाणी नाही म्हणुन इथले ग्रामस्थ आत्महत्या करण्यापर्यंत गेले आहेत. कारण या गावांमध्ये कुठल्या प्रकारचं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या पुढार्यांच्या आश्वासनाला बळी पडून वैतागून गेली आहेत कारण या गावांमध्ये फक्त पाणी नाही म्हणून इथला 20 एक्कर असणारा शेतकरी विदर्भात जाऊन दीड एकर शेती असणाऱ्या पाशी आपलं पोट भागवण्यासाठी ऊस तोडत आहे. पाण्या वाचून या गावातील मुलांचे लग्न होईना झालेत पाणी नाही म्हणून ह्या शेतीला भाव नाहीये आणि नाईलाजाने या गावातील मुलं आपलं पोट भागवण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जाऊन काम करत आहेत. आणि या गावचा शेतकरी ऊस तोडून कर्ज काढून आपल्या मुलाला बाहेर जिल्ह्यात शिकायला पाठवत आहे. या सगळ्याला कारण फक्त एकच आहे कोरडेवाडीचा साठवण तलाव गेल्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून राजश्रीताई उंबरे पाटील यांनी कोरडेवाडी या गावात साठवण तलावाच्या प्रश्नासाठी अकरा दिवस बिन अन्न पाण्याचं आमरण उपोषण केलं होतं त्यावेळीस देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उपोषणाच्या अकराव्या दिवशी समस्त कोरडेवाडी गावकरी मंडळी समोर कॉल द्वारे सांगितलं होतं उपोषण स्थगित करा तुमची साठवण तलावाची मागणी मी लवकरच मान्य करत आहे पण आज त्याच गोष्टीला व त्यांच्या आश्वासनाला पूर्ण एक वर्ष झाला आहे तर त्याच अनुषंगाने आज कोरडेवाडी या गावात पुन्हा नव्याने कोरडेवाडी गावकऱ्यांच्या बळावर व धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा वारे पाटील यांच्या माध्यमातून आज अकरा दिवस झालं राजश्रीताई उंबरे पाटील यांचा कोरडेवाडी या गावात आजचा उपोषणाचा अकरावा दिवस आहे आणि आज उपोषण 11 दिवस उलटूनही कोणताच प्रतिनिधी व प्रशासनाचा अधिकारी उपोषण स्थळे भेट देण्यात आलेला नाहीये . आत्ताच काही दिवसाखाली केज तालुक्यातील तहसील कार्यालय समोर बैलगाडी मोर्चा घेऊन तहसील कार्यालयासमोर बैलगाडी जाळण्यात आली होती तर त्यावेळेस आठ दिवसानंतर कुठे तहसीलदाराने उपोषण स्थळी भेट दिली व दोन दिवसा खाली कोरडेवाडी या ग्रामस्थांकडून आपल्या साठवण तलावाच्या प्रश्नासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते कारण सरकारचं व प्रशासनाचे लक्ष कसं केंद्रित करावं यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते तरी देखील सरकारला जाग आलेली नाहीये तर त्याच अनुषंगाने उद्या दिनांक 14 10 2025 रोजी केज तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि जर का येत्या दोन दिवसांमध्ये या आंदोलनाची व उपोषणाची दखल घेण्यात नाही आली तर सरकारला हे शेतकऱ्याचे आंदोलन मोठे भोवनार. कारण सरकारला आम्ही त्यांच्या तिजोरीतील संपत्ती किंवा त्यांच्या जमिनी नाही मागत आहोत आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागत आहोत व आम्ही आमच्या मागणीसाठी गेली 30-35 वर्ष झाले संघर्ष करत आहोत जर का दोन दिवसांमध्ये आमची दखल घेतली नाही तर या मराठवाड्यामध्ये शेतकरी काय करू शकतो हे नक्कीच मात्र सरकारला दाखवून देईल.असे मत सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल वरपे पाटील यांनी केले आहे.
Comments
Post a Comment