श्रीनाथ गीते प्रशासकीय व्यवस्थेचा बळी,पोलिसांनी संस्थाचालक व समाज कल्याण विभागातील दोषीवर कारवाई करावी -सुनिता गीते

बीड प्रतिनिधी - एका महिन्यापूर्वी आश्रम शाळेवर नोकरीसाठी रुजू झालेला श्रीनाथ गीते हा प्रशासकीय व्यवस्थेचा बळी ठरला आहे. यामध्ये दोषी संस्था चालक विरोधात एफ आय आर दाखल झाला आहे मात्र परळी ग्रामीण पोलिसांकडून कारवाई शून्य, तसेच समाज कल्याण कार्यालय बीड मध्ये देखील नोकरीवर घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती व त्रास दिला होता. श्रीनाथ गीतेला ज्या दिवशी नोकरीवर जाण्यासाठी ऑर्डर दिली होती त्या दिवशी. संस्थाचालक व समाज कल्याण खात्याने संगणमत करून दुसऱ्या चार जागा संस्थेवर भरल्या त्याचे सर्व पुरावे गीते कुटुंबाकडे आहेत. सदरील संस्था चालकावर या अगोदरचे तीन गंभीर गुन्हे असून त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये अशी ही मागणी गीते कुटुंबीयांनी केली आहे.


श्रीनाथ गीते याला आत्महत्या करण्यास भाग पाडलेल्या व गुन्हे दाखल झालेल्या संस्थाचालक व समाज कल्याण मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मयत श्रीनाथ गीतेच्या आईने सुनिता गीते लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वीस लाख रुपयांची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली होती मात्र ती पूर्ण करू न शकल्याने समाज कल्याण व संस्थाचालकांनी संगणक करून. श्रीनाथ गीतेला त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्रास सहनशील तिच्या बाहेर गेल्याने त्याने गळफास घेऊन शेवटी आपले जीवन संपवले. मात्र निगरगट्टा पोलीस प्रशासनाने संस्थाचालकावर कारवाई केली नाही व समाज कल्याण कार्यालयातही याप्रकरणी चौकशी केली नाही. आता सुनिता गीते यांचे कुटुंबीय हे उघड्यावर पडले आहे. न्याय मिळावा यासाठी ते पुन्हा शासन दरबारी फिरत आहेत. व या प्रकरणाशी निगडित सर्वच कार्यालयामध्ये त्यांनी निवेदन देऊन न्याय मागितला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी