शुभावती भोबे यांचे अद्वितीय दातृत्व : लाखमोलाची जागा समाजासाठी समर्पित



 विवेकानंद भवनाचे नामकरण व नुतनीकरण सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंतांची कृतज्ञता व्यक्त

 पणजी, ११ सप्टेंबर २०२५:स्वामी विवेकानंद यांची 'मनुष्य निर्माणातून देश निर्माण' ही संकल्पना आज देश पुढे देण्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. श्रीमती शुभावती भोबे यांनी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला समर्पित केलेल्या वास्तूचा नामकरण व नुतनीकरण सोहळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत विवेकानंद भवन, पर्वरी येथे पार पडला, त्याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.  

या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पेन्ह द. फान्सच्या जिल्हा पंचायत सदस्या कविता गुपेश नाईक, पेन्ह द. फान्स पंचायतचे सरपंच सपनील चोडणकर, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र व गोवा प्रांतप्रमुख अभय बापट आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रारंभी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा आसाममधल्या महिलांनी खास पद्धतीने विणलेली शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

याप्रसंगी बोलताना विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र व गोवा प्रांतप्रमुख अभय बापट म्हणाले, आज विश्वबंधुत्व दिन असून आजच्या दिवशी गोव्यासारख्या ठिकाणी या वास्तूचा नामकरण सोहळा होत आहे हे विशेष. स्वामी विवेकानंदांचे गोव्याशी विशेष नाते असून ख्रिश्चन धर्माच्या अभ्यासासाठी स्वामीजी गोव्यात वास्तव्यास होते. या केंद्राच्या निर्मितीसाठी गोवेकरांचे मोठे सहकार्य लाभले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या मदतीसाठी आम्ही त्यांचे कायम ऋणी आहोत. 

तर या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, या वास्तूची उभारणी होताना आम्ही ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले आहोत. शुभावती भोबे यांचे दातृत्व हे गोव्यासाठी मोठे योगदान ठरले आहे. त्यांनी स्वार्थी विचार न करता लाखमोलाची इमारत आणि जागा समाजासाठी दिली असून त्यासाठी त्यांना मी धन्यवाद देतो. आज या सभागृहाला ज्या एकनाथ रानडे यांचे नाव दिले गेले त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार भारतभर रुजावेत यासाठी विशेष योगदान दिले आहेत. भारतीय संस्कृतीच्या शिक्षणातून समाजाचा विकास होत असून गोव्यात कित्येक दशके स्वामीजींचे कार्य सुरू असून ही अभिमानाची गोष्ट आहे. सभागृह उभारणी म्हणजे फक्त चिरा, सिमेंट, विटा एकत्र करणे नव्हे तर समविचारी आणि राष्ट्रउभारणीचा एक एक विचार जमून त्याची उभारणी करणे होय. मी उपस्थित तरुणांना पुन्हा हेच सांगेन, 'चला, उठा, जागे व्हा, ध्येय गाठा. राष्ट्राला उभारी देण्यासाठी आपले योगदान द्या.!

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी