शेवगांव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. रामदास रंगनाथ आगळे तर उपाध्यक्षपदी ऍड.मुनाफ अल्ताफ शेख यांची निवड
[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 / 9270442511
दिनांक 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव तालुका बार असोसिएशन तथा तालुका वकील संघाची नवीन कार्यकारणी जाहीर काल जाहीर झाली त्यात अध्यक्ष सचिव खजिनदार बिनविरोध तर ईतर जागांसाठी काल दिनांक 11 सप्टेंबर रोजी झाली निवडणुक यामध्ये संघाच्या अध्यक्षपदी ऍड. रामदास रंगनाथ आगळे तर उपाध्यक्षपदी ऍड. मुनाफ अल्ताफ शेख तर सचिवपदी सुहास झुंबरराव चव्हाण तर खजिनदार पदी ऍड अजय अशोक मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत एकूण 86 दाभासदांपैकी 80 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात ऍड.शेख मुनाफ अल्ताफ ऍड. बोरुडे लक्ष्मण रमेश यांच्यात चुरशीची लढत होऊन ऍड. शेख यांना 53 तर ऍड. बोरुडे यांना 26 मते मिळाली ऍड शेख यांनी तब्बल 27 मतांनी विजय मिळविला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडीत नवनिर्वाचित कार्यकारणीचे वकील संघाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. या निवडीबद्दल तालुक्यातील सहकारी वकील सदस्य पक्षकार आणि नागरिकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment