पंजाब आणि छत्तीसगडमधील पूरग्रस्तांसाठी गोवा सरकारने दिला मदतीचा हात
पणजी, ८ सप्टेंबर २०२५: पंजाब आणि छत्तीसगडमध्ये अलीकडे घडलेल्या भयंकर पूरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांसोबत एकजुटीचा संदेश देत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सचिवालयातून दोन ट्रकभरून आवश्यक मदतीचे साहित्य दोन्ही पूरग्रस्त राज्यांना पाठवले आहे.
कार्यक्रमात बोलताना, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, “नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना सर्वाधिक आधाराची गरज असते. गोवा सरकार आणि गोव्याच्या जनतेकडून आम्ही पंजाब व छत्तीसगडमधील नागरिकांसोबत उभे आहोत. तातडीच्या मदतीसाठी आधीच ५ कोटी रुपयांची रक्कम पाठविण्यात आली असून आम्ही तेथील स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक वस्तूंची तपशीलवार यादी मिळाली आहे. ट्रकमध्ये कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू आज पाठवण्यात आल्या असून ते तातडीने प्रभावितांना पोहोचेल याची आम्ही काळजी घेणार आहोत".
या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, म्हापसा आमदार जोशुआ पीटर डीसूझा आणि सचिवालयातील इतर अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.
Comments
Post a Comment