डॉ.योगेश क्षीरसागर यांची सीओंसोबत चर्चा; वृक्षलागवड, सुशोभीकरण, फाऊंटेन, पार्किंगच्या मुद्द्यांकडे वेधले लक्ष

नगरपरिषदेसह सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून बीड शहराचे सौंदर्यीकरण

डॉ.योगेश क्षीरसागर यांची सीओंसोबत चर्चा; वृक्षलागवड, सुशोभीकरण, फाऊंटेन, पार्किंगच्या मुद्द्यांकडे वेधले लक्ष
बीड (प्रतिनिधी )
दि.११ : शहराचे सौंदर्यीकरणासाठी बीड नगरपरिषदेत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संस्थांची गुरुवारी (दि.११) बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. शहरातील रस्त्यांचे डेव्हलपमेंट, वृक्षलागवड, स्वच्छता, सुशोभीकरण, सार्वजनिक सोयीसुविधा या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रस्तावित नवीन रोड व डीपी रोडमध्ये वृक्षारोपणासाठी जागा सोडून अंडरग्राउंड ड्रिपद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करणे, बंद असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या ठिकाणी भाजी मंडई व महिला बचत गटासाठी मॉल उभारणे, शहरातील ओपन स्पेसला तारकंपाउंड करून वृक्षलागवड करणे, नवीन फुलांचे गार्डन प्रस्तावित करणे, चौक सुशोभीकरणांतर्गत शहरातील प्रमुख चौकात फाउंटेन उभारणे, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील आतील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करणे, जालना रोड दुभाजकाचे सुशोभीकरण करणे, शहर व उपनगरातील ओपन स्पेसमध्ये घनदाट जंगल प्रकल्प उभारणे हे निर्णय घेतले. बैठकीत कोटक महिंद्रा बँकेने सामाजिक जबाबदारी अंतर्गत १ घंटागाडी व १०० डस्टबीन देण्याचे पत्र नगरपरिषदेला सुपूर्द केले. याबाबत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. ही छोटेखानी बैठक झाली असली तरी लवकरच व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी फडसे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आय.एम.ए. जिल्हाध्यक्ष डॉ. अनंत मुळे, रोटरी क्लब अध्यक्ष विकास उमापूरकर, शहराध्यक्ष राहुल बोरा, झाडांची भिसीच्या प्रतिनिधी डॉ. नाईकवाडे, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, कॅनरा बँक, कोटक बँक, आयडीबीआय आदी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी