लोकांच्या स्वप्नातील घरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या कष्टकरी हातांचे स्वप्न अजित दादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करणार- शेख निजाम
लोकांच्या स्वप्नातील घरांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या कष्टकरी हातांचे स्वप्न अजित दादा पवार यांच्या माध्यमातून पूर्ण करणार- शेख निजाम
कामगारांच्या व लाडक्या बहिणीच्या मागे अजित दादा खंबीरपणे उभा - लोकपत्रकार तथा प्रदेश प्रवक्ता भागवत तावरे
बीड प्रतिनिधी :-महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून जय हिंद कॅम्पस मिलत नगर बीड येथे पंधरा दिवसीय कामगार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते सदरील प्रशिक्षणाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेख निजाम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश प्रवक्ता भागवत तावरे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते यावेळी त्यांना प्रत्यक्ष साइटवर तसे काम करावे सुरक्षा उपकरणे ही हाताळावी व इतर महत्व पूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले यावेळी बोलताना शेख निजाम यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की बांधकाम कामगार हा जनतेच्या स्वप्नातील घरे आपल्या घामाच्या माध्यमातून व कष्टाच्या माध्यमातून घडवतो व लोकांचे जीवनामध्ये आनंद पसरवतो परंतु बांधकाम कामगार व इतर कामगार यांना व त्यांच्या कुटुंबीयांना हवा तसा मोबदला मिळत नाही व ते सामाजिक प्रवाह मध्ये शिक्षण आरोग्य व सुरक्षा याबाबत नेहमी मागासले असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे यामुळे महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार व इतर कामगार यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केलेल्या असून त्यामध्ये प्रामुख्याने कामगार विमा योजना, सुरक्षा संच पेटी, मातृत्व योजना, पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना यासारख्या अनेक योजना शासन राबवत असून त्याचा फायदा नोंदणी करत कामगारांनी अवश्य घ्यावा व लोकांच्या स्वप्नातील घरे प्रत्यक्षात घडवणाऱ्या कष्टकऱ्यांचे स्वप्न मा. ना. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब आमदार विजयसिंह पंडित साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करणार व कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी पूर्णपणे खंबीरपणे उभा राहील याची ग्वाही दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लोकपत्रकार भागवत तावरे यांनी आपल्या मनोगत मध्ये महाराष्ट्र शासन व विशेषता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महिला सबलीकरणासाठी कामगारांच्या उन्नती करिता काम करीत असून शासनाच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य कष्टकरी कामगार घटकापर्यंत लाभ पोहोचवण्याचे काम व पुण्य अजित दादा पवार करीत असल्याचे सांगितले व अजित दादा पवार यांच्या माध्यमातून बांधकाम कामगार व इतर कामगारांचे प्रश्न मोठ्या स्वरूपात सोडवण्यात येईल व विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत कशी आणता येईल यासंबंधी यापुढे काम करणार असल्याचे म्हटले यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन जिल्हाध्यक्ष शेख नसीर ,शेख खय्युम इनामदार,शेख रौफ व संघटनेचे अन्य पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment