गेवराई तहसीलवर वंचित बहुजन आघाडी कडून जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन- पप्पू गायकवाड
गेवराई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शासनाने जन सुरक्षा कायदा लागू न करणे व तसेच गेवराई तालुक्यातील गरीब वंचित शेतकरी कष्टकरी मागासवर्गीय यांच्या विविध मागण्याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे गोरगरीब सर्वसामान्यांची हेडसांड होत आहे. त्यासाठी सर्वसामान्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी दि.१२ रोजी गेवराई तहसील कार्यालयावर "जन आक्रोश महामोर्चा" काढण्यात येनार आसुन याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असे दिलेल्या निवेदनात वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी म्हटले आहे.
उपोषण आंदोलन रास्ता रोको करूनही सरकारला जाग येत नाही त्यासाठी जनतेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे भव्य आणि आयोजन करण्यात आले आहे.
जुनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असताना प्रशासनाला निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र राज्य शासनाने जो जन सुरक्षा कायदा अमलात आणण्याचे ठरवले आहे तो लोकशाहीचा गळा घोटल्यासारखा होईल सर्व सामान्यांचा लोकशाही मार्गाने आवाज उठवणे, आंदोलन करणे याला आळा घालण्याचा प्रयत्न आहे. याकरिता वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्यातील तीव्र विरोध आहे. या कायद्याला वंचित बहुजन आघाडीचा कायम विरोध आहे. हा जन सुरक्षा कायदा लागू करण्यात येऊ नये, तसेच गेवराई तालुक्यातील शेतकरी मजूर, कामगार यांच्या मूलभूत गरजा परिपूर्ण होत नाहीत, यासाठी आमच्या गेवराई तालुक्यातील खालील प्रमाणे मागण्या तात्काळ मान्य कराव्यात.
१) जन सुरक्षा कायदा रद्द करणे.
२) गायरान धारकाची एक-ई ला नोंद करून तात्काळ ७/१२ देण्यात यावा.
३) अतिक्रमण गायरानधारक यांच्या सातबारातील पोट खराब नोंद रद्द करून ७/१२ तात्काळ देण्यात यावा.
४) गेवराई तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे.
५) रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, यशवंत आवास योजना, अहिल्याबाई होळकर आवास योजनातील लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे.
६) संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, अपंग निराधार योजनेच्या मानधनात वाढ करून किचकट असलेल्या अटी रद्द करून लाभाध्यांच्या खात्यात मानधन नियमित जमा करण्यात
७) अतिवृष्टीमुळे, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात यावी.
८) गेवराई तालुक्यातील १३८ ग्रामपंचायत मधील दलित वस्ती, बंजारा वस्ती, धनगर वस्ती, भिल्ल वस्ती येथाल रस्ते व नालीचे कामे तात्काळ करण्यात यावी.
९) सर्व मागासवर्गीय वस्ती मध्ये विद्युत पोल लावण्यात यावेत.
१०) गेवराई तालुक्यातील स्मशानभूमी व समाज मंदिरासाठी मागासवर्गीयांना तात्काळ जागा उपलब्ध करून तात्काळ बांधण्यात यावेत.
११) रोजगार हमी योजना गाय-गोठा मोहगणी, जलसिंचन विहीर, तुती लागवड या योजनेची नवीन कामे तात्काळ करण्यात यावीत.
१२) सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग-धंद्यासाठी एमआयडीसी तात्काळ करण्यात यावी.
१३) रेल्वेचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला रेल्वे प्रकल्प तात्काळ सुरू करण्यात यावा.
गेवराई तालुक्यातील जनसामान्य लोकांच्या मागण्या व गरिब, शोषित, वंचित, मागासवर्गीय लोकांच्या लोकहिताच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्या. अन्यथा दि.१२रोजी शुक्रवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते गेवराई तहसील कार्यालयावर "जन आक्रोश महामोर्चा" काढण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असे मा. मुख्यमंत्री , मा.जिल्हाधिकारी बीड व तहसीलदार गेवराई यांना दिलेल्या निवेदनात गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अजयकुमार उर्फ पप्पू गायकवाड यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment