सुजाता शिनगारे यांना समाजशास्त्र विषयात पीएचडी
धारुर : तालुक्यातील आरणवाडी येथील सुजाता राम शिनगारे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने समाजशास्त्र विषयात पीएचडी जाहीर केली आहे.
ज्येष्ठ सामाजिक अभ्यासक डॉ. स्मिता अवचार यांच्या मार्गदर्शनात 'वृद्ध महिलांच्या आरोग्याच्या समस्या : विशेष संदर्भ औरंगाबाद शहर' या विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यास विद्यापीठाने मान्यता दिली आहे. डॉ. सुजाता शिनगारे यांनी एम.ए. समाजशास्त्रातही विद्यापीठातून प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याशिवाय एम.फिल.चे संशोधनही पूर्ण केलेले आहे. या यशाबद्दल धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, संचालक शिवाजी मायकर, न्यूरोलॉजिस्ट डॉ. विलास शिनगारे, डॉ.रामहारी मायकर, ॲड. सार्थक माने, आरणवाडीचे सरपंच भागवत शिनगारे, सदाशिव शिनगारे, सतीश शिनगारे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment