आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांचे ‘ओएसडी’पदी प्रा.डॉ.हमराज उईकेंची नियुक्ती



डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार; नवगण शिक्षण संस्थेमध्ये आहेत कार्यरत

बीड (प्रतिनिधी)
दि.८ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी प्रा.डॉ.हमराज उदयभान उईके यांची ‘ओएसडी’पदी (विशेष कार्य अधिकारी) राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. ते नवगण शिक्षण संस्था संचलित परळी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख असून त्यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

प्रा.डॉ.हमराज उईके यांनी नियुक्तीनंतर मंत्री कार्यालयात रुजू होऊन कार्यभार स्वीकारला. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहे. ‘भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत जनजाती (आदिवासी) समाजाचे योगदान व भूमिका’ या विषयावर नुकतेच बीडमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राचे निमंत्रक म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांची शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यतत्परता लक्षात घेता आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी प्रा.डॉ.हमराज उईके यांच्यावर ‘ओएसडी’ पदाची जबाबदारी दिली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे विभागाचे कार्य अधिक वेगवान व परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, नियुक्तीबद्दल प्रा.डॉ.हमराज उईके यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी