प्रसिद्ध समाजसेविका रुख्मिणी नागापुरे यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
बीड - रुक्मिणी नागापुरे या बीड जिल्ह्यातील असून सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये एक समाजसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. महिला आर्थिक, राजकीय, सक्षम झाल्या पाहिजे हा त्यांचा विचार. जातीभेद नष्ट व्हावा आणि समता प्रस्थापित व्हावी या साठी लढा सुरु असतो. महिलांना मार्गदर्शन, गोरगरीब लोकांच्या न्यायासाठी आंदोलन, मोर्चे निवेदन वर्षभर असं त्यांचं काम सुरु असतं. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संकल्प बहुद्देशीय संस्था अकोला व बी.एस.एफ बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील लोकांना कृती गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे हा पुरस्कार सोहळा नोव्हेंबर महिन्यात होईल. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 50 लोकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी, प्रमाणपत्र व शाल या स्वरूपात असून या पुरस्कार सोहळ्याची तयारी सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक भूषण सरदार व नरेंद्र इंगळे असून आपला प्रस्ताव किंवा माहिती 9420621994 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी अशी माहिती बी.एस.एफ.संस्थेचे अध्यक्ष भूषण सरदार यांनी दिली.
Comments
Post a Comment