दिलेल्या आश्वासना प्रमाणे एक महिन्यात संपूर्ण प्रश्न मार्गी न लावल्यास पुन्हा आंदोलन करू :-प्रा.किसनं चव्हाण
गेवराई (प्रतिनिधी) दि.१२ तालुक्यातील शोषित पीडित वंचितांच्या विविध प्रश्नांचा निपटारा करण्याच्या हेतूने गेवराई तालुका वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्यावतीने तालुका अध्यक्ष पप्पु गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलवर जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महासचीव प्रा.किसन चव्हाण म्हणाले की पंडीत,पवार केवळ दलित, मुस्लिम, ओबीसी, आदिवासी यांचे मते घेण्यासाठी वाडी-वस्ती तांड्यावर, पाड्यावर येतात परंतु या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी फक्त वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन, मोर्चा काढू मार्गी लावतात त्यामुळे जणतेने देखील पुढील काळात जो आपले प्रश्न मार्गी लावतो,जो आपल्या आडचनीवेळी खंबीरपणे सोबत राहतो त्याच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मते दिली पाहिजेत.
जन सुरक्षा विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावे, गायरान जमीन सातबारा लावून देणे, गावठाण जमिनीवरील अतिक्रमण कायमचे करून पीटर देणे, घरकुलधारकाकडून सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून होत असलेली पैशाची मागणी तात्काळ बंद करण्यात यावी, विधवा निराधार यांच्या पगारी पूर्वत करून रखडलेले अर्ज तात्काळ मार्गी लावण्यात यावेत या विविध मागण्यांकरिता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव तथा बीड जिल्हा प्रभारी किसन चव्हाण व बीड जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलवर भव्य अशा जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्य तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा बीड लोकसभा 2019 चे उमेदवार प्रा.विष्णु जाधव,धम्माभाऊ साळवे ,खंडु जाधव, राजेंद्र पोकळे, सुदेश पोदार, संदीप रोकडे, किरण वाघमारे,सचिन मेघडंबर, बाळासाहेब गायकवाड, किशोर भोले,रेवन गायकवाड, ज्ञानेश्वर हवाले,
जोपर्यंत प्रशासकिय अधिकारी आंदोलन स्थळी येवुन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत जागचे हलनार नाही अशी भुमिका घेतल्यावर तहसिलदार खोमने यांनी बैठक आटपती घेत ना.तहसिलदार यांच्यापाशी लेखी पत्रक देऊन तहसिल संबंधित कामे एका महिन्यात मार्गी लावु असे लेखी आश्वासन दिले,लगेचच गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती अंतर्गत येणारे मागण्यातील सर्व प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन दिल्यानंतर जनाक्रोश आंदोलन मागे घेण्यात आले.
Comments
Post a Comment