कुत्र्यांच्या हल्ल्यातून हरणाची सुटका गणेश खाडे फौजीच्या धाडसी उपक्रमाचे गावकर्याकडून कौतुक
पाटोदा (प्रतिनिधी) आजच्या धावपळीच्या जगात माणूस स्वतःपुरता विचार करत असताना, करंजवण येथील गणेश खाडे फौजी व त्यांच्या मित्रांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे. करंजवण मार्गावर चार-पाच कुत्र्यांनी हरणावर हल्ला केला होता. जखमी हरणाचे तडफडणे पाहताच गणेश खाडे फौजी व सोबत्यांनी कोणतीही पर्वा न करता तत्काळ धाव घेतली. बाबासाहेब नागरगोजे, तानाजी खाडे,विशाल खाडे, अमोल सानप, सुमित सानप व केशव खाडे या तरुणांनी मिळून कुत्र्यांना पळवून लावले. त्यानंतर हरणाला सुरक्षित स्थळी नेऊन वनविभागाचे पवार यांच्याकडे सुपूर्द केले.या घटनेतून समाजात संदेश जात आहे की फक्त माणूस नव्हे तर प्रत्येक जीवाचा जीव महत्त्वाचा आहे. करंजवण परिसरात या घटनेची सर्वत्र चर्चा असून, गावकऱ्यांनी या तरुणांच्या कार्याचे भरभरून कौतुक होत असुन प्रत्येक जीवाचे प्राण वाचवणे हीच खरी माणुसकी हा संदेश गणेश खाडे फौजी यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment