सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्माननीत



बीड प्रतिनिधी :- सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे वंचित उपेक्षित घटकातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेल्या कार्ये , ऊसतोड कामगार, स्थलांतरीत कामगार ,विटभटी कामगार,भटके विमुक्त समाजातील लोक व एकल महिला व बालकांच्या हक्कांच्या संदर्भात करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांना राष्ट्रीय भटके विमुक्त दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित राष्ट्रीय भटके विमुक्त दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जीतीन रहेमान साहेब,
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदरणीय मेश्राम मॅडम,उपशिक्षणाधिकारी आदरणीय जमीर शेख सर , इतर मागास प्रवर्ग विकास विभागाचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर,संध्याताई राजपूत,भटक्या विमुक्त विकास परिषदेचे देवगिरी प्रांत संयोजक उमेश जोगी, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गिरी, अॅड जाधव, बालाजी पवार, दादासाहेब नन्नवरे यांच्यासह मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
      केज तालुक्यातील मौजे जोला येथील भुमिपुत्र बाजीराव नवनाथ ढाकणे हे ऊसतोड कामगार, स्थलांतरीत कामगार विटभटी कामगार, भटके विमुक्त समाजातील लोक व एकल महिला व बालकांच्या हक्कांच्या संदर्भात करत असलेल्या सामाजिक कार्याच्या १५ वर्षाच्या प्रदिर्घ कार्याची दखल घेऊन रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी " राष्ट्रीय भटके विमुक्त दिनाच्या " निमित्ताने आयोजित कार्यक्रमात श्री बाजीराव नवनाथ ढाकणे यांना बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जितीन रहेमान साहेब व निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय ग्रंथ, शाल, श्रीफळ देऊन सन्माननीत करण्यात आले .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी