बीड शहर बचाव मंच व एसडीपीआय पार्टी चे जिल्हाधिकारी, एस पी साहेब, न.प मुख्याधिकारी यांना तातडीचे निवेदन
17 सप्टेंबर पर्यंत शहरातील तातडीची कामे, तात्काळ करण्यात यावीत..
बीड प्रतिनिधी : बीड शहर बचाव मंच व एस डी पी आय पार्टी, कम्युनिस्ट पार्टी च्या वतीने येत्या 17 सप्टेंबर 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील तातडीची कामे तात्काळ उरकवून घ्यावीत यासाठी जिल्हाधिकारी साहेब, एस पी साहेब व मुख्याधिकारी नगरपरिषद या तिघांनाही निवेदने देण्यात आली. 17 सप्टेंबर पर्यंत शहरातील तातडीची कामे तात्काळ करण्यात यावीत अशी आग्रही विनंती करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे प्राधान्याने चालू आहेत व लवकरच पूर्ण करण्यात येतील असे प्रशासनाच्या वतीने आश्वस्त करण्यात आलेले आहे. बीड शहरातील रस्ते, नाल्या पथदिवे, कचरा व नालेसफाई, बंद घंटागाड्या, वाहतूक व्यवस्था या सर्व समस्यांमुळे बीड शहराची परिस्थिती अतिशय दयनीय व हलाखीची झालेली आहे. शहरातील सर्व भागातील सर्व स्तरातील नागरीक अतिशय त्रस्त झालेले आहेत. नागरिकांच्या समस्यांना व सहनशक्तीला काही सीमा-मर्यादाच राहिलेली नाही. प्रचंड हाल अपेष्टा नागरिक सहन करत आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब, एस. पी. साहेब व मुख्याधिकारी नगरपरिषद यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे ,
शहरांमध्ये सर्व रस्त्यांवर पार्किंग-मार्किंग पांढऱ्या पट्ट्या तसेच ट्रॅक मार्किंग पांढऱ्या पट्ट्या तात्काळ मारण्यात याव्यात.
ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार पार्किंग व नो पार्किंगचे बोर्ड कायमस्वरूपी लावण्यात यावेत.
सर्व जुन्या नव्या अधिकृत रिक्षा थांब्यांवर अधिकृत पार्किंगचे तसेच वाहन संख्या मर्यादेचे बोर्ड लावण्यात यावेत.
शहरातून जाणारे सर्व मुख्य हायवे व अंतर्गत रस्ते यावर आवश्यकतेप्रमाणे तसेच दुभाजक व्यवस्थेच्या नुसार तात्काळ सिग्नल लावण्यात यावेत व चालू करण्यात यावेत.
शहरांमध्ये रोज फिरणारे नियमित अतिक्रमण पथक तसेच नो पार्किंग पथक चालू ठेवण्यात यावे.
मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा.
नगर रोड परिसरामध्ये सर्व शासकीय कार्यालयांच्या व आस्थापनांच्या समोर पार्किंग व नो पार्किंगचे नियोजन करण्यात यावे आदरणीय कोर्ट इमारतीच्या समोर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर यू'टर्न देण्यात यावेत.
शहरातील नियमित सफाई व कचरा व्यवस्थापनासाठी कमीत कमी नव्या 4 ते 5 जे.सी.बी. मशीन्स व 50 घंटा गाड्यांची तात्काळ गरज आहे तरी शासनाने त्या उपलब्ध करून द्याव्यात. नियमित सफाई मोहीम चालू ठेवण्यात यावी.
मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा.
शहरातील सर्व भागातील पथदिवे तात्काळ वाढवण्यात यावेत. याचा अहवाल नुकताच काही दिवसांपूर्वी नगरपालिकेला दिलेला आहे.
नगरपालिकेने दिलेल्या दिनांक 14/8/2025 रोजीच्या पत्रानुसार पत्र क्रमांक आवक जावक क्रमांक 3299 नुसार धानोरा रोड भागातील खड्डे मुरूम टाकून तात्काळ बुजवण्यात येणार होते. तरी अद्यापही खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. तरी अंकुश नगर व धानोरा रोड परिसरातील रस्त्यावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत.
शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तरी सर्वच भागातील रस्त्यांवरील खड्डे मुरूम टाकून तात्काळ बुजवण्यात यावेत. जिल्हाधिकारी साहेब, एस पी साहेब मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी बीड शहर बचाव मंच, एस डि पी आय. पार्टी व कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने, कॉम्रेड प्राचार्य डी जी. तांदळे सर, कॉम्रेड नितीन जायभाये, कॉम्रेड भाऊराव प्रभाळे, ॲड.अनिल बारगजे, ॲड.नितीन वाघमारे, बाजीराव ढाकणे, मा.न से. सय्यद फारूक, एस डी पी आय. पार्टीच्या वतीने शेख अब्दुल कादर महासचिव सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया बीड जिल्हा,कलीम ईनामदार जि.समिति सदस्य, एजास चौधरी ज़ि.समिति सदस्य, काज़ीतक़ीउद्दीन,आदिल भाई आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment