कंत्राटी कामगारांच्या न्याय व हक्कासाठी रोमसेचे अन्नत्याग उपोषण-भाई गौतम आगळे


बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील कार्यरत घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटी कामगार व परळी औष्णिक विद्युत केंद्रातील वीज कंत्राटी कामगारांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी व कंत्राटी कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ०८:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर कंत्राटी कामगार प्रतिनिधी तथा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. 
      या बाबत सविस्तर वृत्त असे की जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांच्या अधिनस्त कंत्राटदार व मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ येथील सर्व विभाग प्रमुखांच्या अधिनस्त असलेले कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगार ( नियमन व निर्मूलन ) अधिनियम 1970 आणि किमान वेतन अधिनियम 1948 च्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच महानिर्मिती प्रकाश गड बांद्रा पुर्व मुंबई व्यवस्थापनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाची सुद्धा काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी. याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत बाबुभाई भालादरे यांनी रोजंदारी मजदूर सेनेच्या माध्यमातून कार्यरत कंत्राटी कामगारांना विशेष भत्ते मिळवून देण्यासाठी राज्यभर वंचित कामगारांचा लढा उभा केला व न्याय सुद्धा मिळवून दिला. परंतु अपवाद बीड जिल्हा राहिला होता, त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारा सहित इतर कामगारांना आणि वीज कंत्राटी कामगारांना किमान वेतनासहित इतर प्रचलित कामगार कायद्याच्या सोयी सुविधा मिळत नसल्याबाबत रोजंदारी मजदूर सेने तर्फे मागील अनेक वर्षापासून विविध निवेदने देऊन प्रसंगी मागणीच्या अनुषंगाने धरणे, निदर्शने, मोर्चा, जेलभरो, आमरण उपोषण, झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलने लोकशाही मार्गाने करण्यात आलेली आहेत.
      एवढा प्रदीर्घ लढा संघटनेच्या वतीने लढून सुद्धा कार्यरत कंत्राटी कामगारांना आजतागायत जिल्हा प्रशासनाने पिडीत कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून दिले नाहीत, ही अत्यंत शरमेची बाब आहे. तेव्हा कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रलंबित मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यासाठी बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 पासून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून कामगार प्रतिनिधी तथा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भाई राजेश कुमार जोगदंड यांनी बुधवार दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून सकाळी ०८:०० वाजल्या पासून जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. अशी माहिती अन्नत्याग उपोषण आंदोलनाचे आयोजक तथा रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी